लेखांक ६१.
श्री.
''राजश्री नारायणजी जुंझारराव देशमुख ता। कानदखोरे गोसावी यांसी :-
॥ ε अखंडितलक्ष्मी-अलंकृत-राजमान्य श्नो रखमाजी अढलराऊ देशमुख ता। वेलवंडखोरे रामराम विनती. येथील कुशळ जाणून स्वकीय कुशळ लेखन करीत गेले पाहिजे. विशेष-आपण देशकुलकर्ण विशीई लिहिलें. त्यास आह्मी कासियावरून सडीं पाठवावी की, तुह्मी अद्यापी राजश्री पंताकडे गेले नाही, आणि समुख बसणेहि जाले नाही. आणि आह्मी कासियावरून सडी घ्यावीं अथवा राजश्री पंताची आज्ञाहि नाही. त्यास, तुह्मी राजश्री पंताची भेटी घेणे. आणि तुह्मी आपले पुरातन जइसे असल ते सांगणे. मग राजश्री पंत माहालीचा देशमुखाची सडीची आज्ञा करितील. मग आह्मी पुरातन जे वर्तले असेल, ते आह्मी लेहून पाठऊन देऊं. तोवरी आह्मास सडी देता न ये. कळले पाहिजे. व गुंजणमावलचे देशमुखहि त्याचीहि सडी आणवावी. दूर माहाल आहेती. कळले पाहिजे. बहुत काय लिहिणे. लोभ असो दीजे हे विनंती.''
लेखांक ६२.
श्री.
''राजश्री बावाजी जुंझारराव देसमुख ता। कानदखोरे साहेबाचे सेवेसी :-
दा। बे॥ भिकाजी रेणुसे मोकदम मौजे पाबे ता। कानदखोरे सु॥ इसने अर्बैन मया अलफ. कारणे साहेबांचे सेवेसी कतबा लेहोन दिल्हा ऐसाजे, आपला आजा बालोजी रेणुसे छ १२ मोहरम पासोन पुडे उपद्रव तुह्मास थली पर-थली आपणाकडे शाबूत जाला, तरी याचा जाब आपण करून. हा कतबा लिहिला. सही छ मजकूर.''
निशाणी. 
(नांगर)
राघोजी बीन मालजी राऊत                       तुकाजी बसापा राजपा कृष्णाजी
पा। अत्रोजी घोडजी हिगा                          लाड चौ। प्रचंडगड मोरोजी
बा। रा। प्रतापराव सीलमकर                     गोळक पेटा वेलवंडी.
देशमुख तर्फ मावळ