लेखांक ५९.

श्रीशंकर.
'' राजश्री बावाजीराव देशमुख ता। कानदखोरे गोसावी यांसी :-

अखंडित-लक्ष्मी-अलंकृत-राजमान्य श्ने॥ जैसिंगराजे सिरके रामराम विनंती उपरी येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लेखन करीत असिले पाहिजे. विशेष :- आपणाकडील सविस्तर वर्तमान कळत नाही तरी सदैव लिहित असावे. यानंतरी श्रीचा मोहछाव आहे. तरी आपण आले पाहिजे. बहुत काय लिहिणे. हे विनंती.''

लेखांक ६०.

श्री.
''राजश्री बावाजी जुंझारराव मरळ देशमुख ता। कानदखोरे गोसावी यांसी :-

॥ ε श्नो गोविंद सामराव नामजाद सुभा प्रा। मावळे आसिर्वाद सु॥ सबा खमसैन मया अलफ. तुमचा व जिवाजी ना। मरळ यांचा कजिला लागला होता. त्याचा निवडा हुजूर राजश्री पंतीं केला. तुह्मी खरे जाला. जिवाजी नाइक खोटे जाले. त्याजबदल तुह्माकडे हरकी सेरणी रुपये करार केले :-

१००० ऐन
३०० नजर
------
१३००

ए॥ तेरासे रुपये राजश्री सिवाजीपंत मजमदार यांचे विद्यमानें सुभा वसूल करून हुजूर दिल्हे. ते पावले असेती. जाणिजे. छ १३ सफर मो। सुद.''

बार.