लेखांक ५६.

श्री.
१६५९ मार्गशीर्ष वद्य २.

''राजश्री नारायणजी जुंझारराऊ मरळ देसमुख र्ता। कानदखोरे गोसावी यास :-

॥ ε अखंडितलक्षुमीअलंकृत राजमान्य स्ने॥ रामाजी आपाजी व भानजी तुकाजी प्रभु देशपांडे ता। मजकूर सु॥ समान सलासीन मया अलफ. कारणे सूवादपत्र तुह्मास लेहोन दिधले ऐसे जे, मौजे पाबे व धानेब ता। मा। हे दोन गाव देशमुखीचे इनाम आहेत. त्यास मौजेमजकूरच्या हकाचा कजिया तुमचा व आमचा होता. तुह्मास व आह्मास किले सिंहगडच्या मुकामी राजश्री पंचसचिव स्वामीनीं आणून, कतबे दोघांचेहि घेतले. ऐसीयास तुह्मी व आह्मी परस्थळीं जाऊन वाद सांगावा हे विहित नाही. त्याजकरितां आपले संतोसें आपण समजलों. बि॥

मौजे पाबे येथील देशकुलकर्णाचा हक व सावोत्रा आपण घ्यावा व देशमुखीचा व सरदेशमुखीचा हक तुह्मी घ्यावा. ऐसा
तह केला कलम १.

धानेबचा तह देशमुखी सरदेशमुखी व सावोत्रा देखील देशकुलकर्णाचा हक तुह्मी
 घ्यावा. कलम १.
 

गावगना इनामें तुमची व आमची आहेत.त्यास तुमच्या इनामावरी आह्मास तुह्मी सावोत्रा व देशकुलकर्णाचा हक द्यावाव आमच्या इनामावरी तुह्मास आह्मी सरदेशमुखीचा हक द्यावा. कलम
१.

एणेप्रमाणे तिही कलमांचा तह केला आहे. तेणेप्रमाणे तुह्मी व आह्मी परस्परे आपले वतन अनभवावे. जो कोणी आपले वौसीचा होत असतां ए गोष्टीस हिलाहरकत करील, तो दिवाणचा गुन्हेगार. गोताचा अन्याई. शक १६५९ पिंगलनाम संवत्सरे मार्गसीर वद्य द्वितीया इंदुवासरे. हे सवादपत्र लेहोन दिल्हे. सही छ १५ साबान.''

बिकलम रामाजी आपाजी देशपांडे ता। मजकूर

साक्ष .

देसक र्ता। मोसेखोरे देसक र्ता। मुठेखोरे
बाजी साबाजी  सताजी बिन भिवजी बिन चाहूजी बिन
एसवंतराव  बकाजीराव रुमाजी गंभीरराव साबाजी गंभीरराव
पासलकर देसमुख पासलकर देसमुख मारणे देशमुख र्ता। मारणे देशमुख र्ता।
र्ता। मा।  ता। दार र्ता। मा। मा। मा।
प्रतापराव पासलकर तर्फदार
देसमुख ता। मा।
तुळाजी बिन साबाजीराव तर्फदार देसमुख र्ता। मा। माधवराव
 जनार्दन देशपांडेए र्ता। मा।
बाबूराव सज णाजी देसपांडे र्ता। मा।
मालजी बिन खेळोजी बिन त्र्यंबकजी रामजी पाटिल
आबाजी ना। बकाजी ना। पाटिल मारणे मारणे मौजे
कड देसमुख जिवगणे तर्फदार मौजे आंबेगाऊ मुरवडे र्ता। मा।
तर्फदार तर्फ देसमुख र्ता। र्ता। मा।  
मजकूर मा।    
एसाजी नर- मोरो गोविंद    
सिंह देसपांडे देशपांडे र्ता।    
र्ता। मा। मा।    
त्रिंबक वासुदेव भास्कर मोरेस्वर    
देसपांडे र्ता। देसपांडे र्ता।    
मा।  मा।    
संताजी भूकर  हरजी जिवगणा    
मोकदम मौजे मोकदम मौजे    
वडघर र्ता। कसेळी र्ता।    
मा। मा।