लेखांक ५७.
श्रीधनेश्वर
१६६१ चैत्र वद्य १३.
''महजरनामा शके १६६१ सिधार्थी नाम संवत्छरे चैत्र बहुल त्रयोदसी भौमवासरे बतारीख २६ माहे मोहरम बिहूजूर गोत
र्ता। मोसे खोरे व र्ता। कानदखोरे
(गोतांचीं नावें दिलीं आहेत. तीं महत्त्वाची नसल्यामुळें येथें लिहीत नाहीं.)
सु॥ तिसा सलासईन मया अलफ शिवजी गंगाधर व खंडो मल्हार उपनाम दिवाकर खासनीस दि॥ देशमुख र्ता। मा।र यासी महजर करून दिल्हा ऐसा जे, तुमची खासनिसी पुरातन वतनी आहे. ऐसीयासी खाननिसीचा हक ता। मजकुरी चालत नव्हता कीं, पुरातन हकजाबीते होते. ते सार्वभौम या प्रांतें आला होता, त्याच्या राजिकांत कोण्हाजवळ राहिले नाहींत. त्यास मनास आणितां खाननिसीस हकाचा तह आहे. याजकरितां तुह्मास हक र्ता मा।रीं करून दिल्हा असे.''
एणे प्रमाणे रकमी खंडकीस रु॥ दबल व गला कैली दोन पाइली व पाहणीचे खंडकीस रुके साहा व गला कैली सवा पाइली हक करार सदरहू देशमुख व देशपांडे व मोकदम देहाय ता। मा। याचें विचारें सदरहू हक तुह्मास खासनिसीचा करून दिल्हा, आणि श्रीमंत राजश्री चिमणाजी पंडित सचिव यांसी विनंति क॥ अंबोणे र्ता। गुंजण मावळ एथील मु॥ देशमुख व देशपांडे ता। मा। याणी अर्ज करून, तुह्मास सदरहू खासनिसीच्या हकाचीं पत्रें भोगोटियासी करून देविली आहेत. छ २० माहे मजकूरची पत्रें अलाहिदा आहेत. तरी तुह्मी व तुमचे पुत्रपौत्र वंशपरंपरेनें हक तह प्रो। घेत जाणें. व दर माहारास राबणूक रोज २ दोन रोज नेमून दिल्हे असेत. या प्रो। माहारापासून राबती घेत जाणें. हा महजर लिहिला. सही मोर्तब असे.''