लेखांक ३८.

श्री.
१६३२ चैत्र शुध्द ९.

'' कौलनामा अज सुभा राजश्री शामजी हरी नामजाद सुभा मावळ ताहा मोकदम व रयानी देहाय गावगना ता। कानदखोरे सु॥ असर मया अलफ बादे कौलनामा ऐसा जे, देशमुख व देशकुलकर्णी सुभा एऊन विनंति केली कीं, ऐंदा सुभाची स्वारी होऊन, माहालीची पाहणी केली. त्यास रयतीस पीक जालें नाही. यामुळें व पाहणीनें रयतीस दम नाहीं. यामुळें पेस्तर सालीची कीर्दी करावयाची रयत उमेद धरीत नाहींत. ह्मणून विदित केलें. त्यावरून रयतीस कौल सादर केला असे. कोण्हे बाबे शक न धरितां, पेस्तर सालीची कीर्दी करणें. तुमची उगवणी जीवनमाफीक करून घेऊन, दरीं बाब कौल. असे. छ ७ सफर मोर्तब सुद.''

लेखांक ३९.

१६३५ ज्येष्ठ वद्य १३.
(फारशी मजकूर.)

'' छ माहे जमादिलावल सन २ जुलुसवाला सुहूर सन अर्बा असर मया व अलफ बो। साबाजी वा॥ तुलाजी येसवंतराऊ पासलकर देशमुख तर्फ मोसे खोरे व संभाजी मराळ बरादर नारायणजी जुंझारराव देशमुख तर्फ कानदखोरे व त्रिंबकजी करजवणा देशमुख तर्फ कर्यात मावळ लेहून दिल्हा कतबा ऐसा जे, मौजे चापेवाडी तर्फ मजकूर येथील रयत वगैरा दस्तगीर स्वारी सेख याकुब सुभेदार बंद आणून, जंजिरीयांत कैदेंत ठेविलें. त्यास ऐन खंड व भता व कोतवाली नगद रुपये ८८९॥ एकूण खुद टके सोडून ह्यांसी करार करून जामीनाबाबे हुकूम केला. त्यावरून आपण मालजामीन असो. ई॥ छ मजकुरापासून एका वरसानी सरकारी वसूल देऊं. हें लेहून दिल्हे. सही प्र॥ हु॥र र॥ खुसमहमद जबानी रूपाजी कडू अफराद.''