लेखांक ३०.

१६१४ माघ शुध्द २.

''राजमान्ये राजश्री (राव) साहेबु देसमुख कानदखोरे स्वामि यांचे सेवेसीं :-

॥ ε अर्जदास्त दर बंदगी हजरती राजाधिराज माहराज या मंडित उदंड अविश हो. राजमान्ये राजश्री सेवक गदाजी प्रभु देसकुलकर्णी तर्फ कानदखोरे जोहार विनंती ता। छ १ माहे जमादिलावल साहेबांचे कृपाद्रुष्टी करून सेवकाचें वर्तमान यथास्थित असे.

द॥ सेवकास साहेबांची रजा व कागद बराबरी तीर्थरूप राजश्री दत्तोपंतदादा या बराबरी पत्र पाठविलें कीं, दोघा विचारे पूर्वी कारभार होतेस तैसे करीत जाणें ह्मणउनु रजा. तरी रजे बरहुकुम तपें मजकुरास आलों. तों येथें आमच्या समंधी दाज प्रभु व विठ प्रभु यांनीं कथला केला आहे जे, देसमुखाबराबरी बाहेर पडिलेस देसमुखाचे वतन गेले. त्याबराबरी तुह्मी हि मिरासीस तुटलेस. ह्मणउनु वेव्हार सांगत आहेती. ऐसियास राजश्री साहेबापासीं उभे राहिलों. तेथें साहेबांपासीं सांगितलें कीं, देसमुख व तिम प्रभु व गदाजी ऐसे मोंगलासीं मिलोन, बाहेर पडोन मारा केला आहे. ऐसियास साहेबें आह्मांस पुसिलें कीं, कीं, देसमुखांनीं मारा केला. खरें कां काय ? त्यास आपण जाब दिधला कीं, देसमुखापासून हे घडनार नाहीं. देसमुख वतनदार. आपल्या वतनावरी जेव्हां ऐसे करितील, तो हें घडत नाहीं. ऐसियास साहेबु धनी आहेती. साहेबांच्या पायापासीं येतील, ते वख्ती आपली पखी देतील. ऐसा जाब दिधला. त्यावरि राइरीप्रत गेलों. तेथें पेसवें व राजश्री मजूमदार ऐसे होते. तेथे आपले वर्तमान हर दो जनानीं सांगितलें. त्यास, सेवकास निरोप दिधला जे, आपले साल खाणें. आनगावास आलों. छ १२ माहे रबिलाखर वर्तमान अइकिला कीं, हवलदार व मुजुमदार यांची दोन च्यारशे कांही उचापति केली, ते सेवके पैलीच हटकिलें. त्यास राइरीउनु आलों तो छ मजकुरी समाचार आइकिला कीं, वाजी जाली, ह्मणउनु तुमच्या नांवें टके २६४ आदा चढिला. ह्मणउनु समाचार आइकिला. तो समाचार आह्मी राजश्री दत्तोपंतास हटकिलें कीं, हें खरें कां खोटें ? त्यास, आह्मास त्याहीं सांगितलें कीं; कातबा देतात. त्या(स), आह्मी राजश्री दत्तोपंतास बोलिलों की, कतबियावरी काय मदार आहे ? आज माहाली दोन अडीच् हजार तहसील जाली असतां, कतबा काय करावा ? अजी सेखाली रोकडी आले, तरी त्यास पाठउनु अजी मराडीचा दिवस आहे ह्मणउनु बोलिला. त्यास पंतीं काय बोलिले तें आपनास कलत नाहीं. व मागते कारकून नेदीतसे जाले. हेहि कळत नाहीं. त्यास आह्मी मागते बोलिलों कीं, न पावतां लिहिलें अन काय ह्मणउनु नेदा ? तरी पेशवियापासीं मागेण ऐसें बोलिलों. त्यास सेवकाचे पाठी वेव्हार लागला आहे. तें काय वर्तमान जाले तेंहि कळलें नाहीं. ऐसियास हा समाचार राजश्री वेदमूर्ति नारायणभटास दखल आहे. साहेबांस कैसा कागद आला असे, तोहि कलत नाहीं. कारभारहि आपनास कळत नाहीं. हा कागद साहेबीं जतण करून ठेविला पाहिजे. याचा मोझ्या होईल. सेवकाची खराबी जाली ते काय ह्मणउनु ल्याहावी ? वेव्हार निरमाण जाला आहे. त्यास सेवट काय होउनु येईल, तें कळत नाहीं. साहेबाबराबरी बाहे पडिलों, ह्मणउनु बदलामी आली. माहालीं कारकुनी त्याची पटी राहिली आहे. कांहीं विचार राजश्री दत्तोपंतास पुसावा, तोहि सांगत नाहीं. ऐसा बाहेर पडलियाचा भोग जाला. कारभारहि सुर्त होईल. आपण खोता पाटिलासि बोलिलो की, देसमुखास पटवावा तोहि प्रभारें रेखोजी गोही आहे. आज तुह्मापासीं काय लेहाने आले असे, ते साहेबास कलो येईल. टका पैके उचापती होईल. एकएकाचे गुजारतीने होवा, तोहि कलत नाहीं. जालें वर्तमान सेवेसीं पटउनु सुर्त होय हे अर्दास.''

अर्दा