लेखांक २९.
श्री.
१६१४ मार्गशीर्ष शुध्द १.
राजेश्वरीभगवती
राजश्री बाबाजी जुझारराउ देसमुख
तर्फ कानदखोरें साहेबाचे सेवेसीं :-
राजश्री भानभट
अर्दास राजश्री
सेवक तिमाजी रुद्रा प्रभु देसकुलकरणी तर्फ मजकूर सेवेसीं. अर्ज सु॥ * * सलासीतैन अलफ सेवेसीं अर्ज ऐसा जे, साहेबीं आपल्या वडिलास इनाम गांवीं सेत मौजे पाबे नजीक सीव मौजे दापोडी तर्फ मजकूर येथील सेत देऊन, चाकरी घेतली आहे. ऐसियासि हाल्ली आपणापासून चाकरीस अंतर पडिलें. ह्मनऊन साहेबीं सेत सालेदा अमानत करविले होते. त्यावरी आपण साहेबांची चाकरी जैसी कांहीं आपल्या वडिली केली आहे. तेच रवेसीनं करावयाची रुजू जालों. ये बाबे साहेबांस मालुम केलें. बितपसिल :-
वेदमूरति दतो बापुजी हेजीब कृष्णाजी मरल
गनोजी सुपेकर चौगुला मौजे अगौली रेखोजी ढरखोली तर्फ मजकूर
सोनजी बीन रतनोजी सेडकर मोक- सोनजी हिराजी
दम मौजे दापोडा जाउजी आधवडा मोकदम मौजे
लासीरगाव
साबाजी ठोसर मोकदम मौजे कोढवल
बावाजी डागी मोकदम मौजे बाह्मनघर
आपले बाबे मालूम केले, त्यावरून साहेब मेहरबान होऊन, आपले सेत मि॥ टके ५० पैकी तकसीम विसाजी गोज प्रभु निमे टके २५ त्याचे दुमाले केले. बाकी टके २५ आपली तकसीम आपले दुमाले केली. तरी आपनहि जैसी कांही आपले वडिलीं साहेबाची चाकरी केली आहे. तेन्हेच प्रमाणा पुढेहि एकतारीने चाकरी करून, एबाबे साहेबांच्या पायापासीं आपल्या वडिलानी जे काही क्रिया इमान करून, चाकिरी केली आहे, तेन च प्रमान आह्मी हि करून सेवेसीं अर्ज.
बीकलाम तीमजी रुद्र प्रभु
तेरीख २८ रबिलोवल.''
अर्ज