तैसेच सिवाजी गंगाधर व संभाजी पाटील व विठोजी पाटील राऊत मौजे अत्रोली वगैरे लोक ऐसे घेऊन श्रीसिकाई मौजे सिरकोली येथे जाऊन, सिवाजी प॥ पडवले व समाकुल पांढर यांच्या विद्ययमाने श्रीस प्रसाद लाविले. तेथे सांगितले, हे लिगाड रेणुसा याचे आहे. तेथून मौजे तावे तेथें जाऊन राजश्री गोरखराव पासलकर देशमुख व समाकुल पांढर ऐसे नेऊन श्रीस विचारिले. तेथेहि रेणुसा याचे लिगाड ऐसे खरें करून सांगितले. मग निघोन घरास आलो. त्याजउपरी बरोबर जे पाटील होते ते व आपण खंडोपंतास विदित केले. त्यास एक दोन दिवस जाले. तेव्हा वेथेस उतार न पडे. ह्मणून खंडोपंतास सांगितले की, रेणुसियास आणून जे सांगावयाचे ते सांगणे. तेव्हा ते बोलिले :- आपण काय सांगावे ? तुह्मी रेणुसियाची समजावीस करणे. त्यावरून आपल्या मनांत विकल्प आला की, आपले वाईट हेच करितात. तेव्हा त्यासी जाब दिल्हा जे, आज तुमचे हाते दिवाणसत्ता आहे, आणि किल्याचे वतीं माहालचे तुमचे हाती पारपत्य होत आहे; आणि आह्मी तुमचे ऐसे असता मन न घालिता ! तेव्हा विस्वर बरे आमचे करितो, तेथें तुमचा उपाय काय आहे ? त्यावरून आह्मास बोलिले, राजश्री पंताकडे अगर सुभेदाराकडे विदित करणे. मग करिना मनास आणून तुह्मा(स) व रेणुसियास ऐसी थले नेमून व मसीदीचे राजणगाव अगर हरेस्वर ऐसे देतील. तुह्माबराबर कारकून व हुजरे देऊन थल करवितील. ऐसी बोली धानेबच्या घरामागें वृंदावनाजवळ जाली. ऐसा जाब त्यानीं पस्ट दिल्हा. त्याउपरी काय त्याच्या चित्तांत आले. तेव्हां आह्मास सांगितले की, त्यास माणूस पाठऊन भिकाजी रेणुसा यास घेऊन येणे. ऐसे बोलिले. त्यासी आपण बोलिलो, तो आमच्या येत नाही, तुह्मीच त्यास घेऊन येणे. त्यावरून दादजी मल्हार, भिकाजीस आणावयास पाठविला. मग त्याजवळ भिकाजी बोलिला की तेथे मी येत नाही. त्याणीं निघोन यावे. मग आह्मी निघोन हुजूर जाऊ. तेव्हा दादजी मल्हार फिरोन आला. मग खंडोपंतीं दादजी मल्हार व संकराजी ढमाल दि॥ राजश्री पंतसचिव ऐसे घेऊन येणे ह्मणून सांगितले. त्यासी त्यावरून निघोन कोढवले बु॥ येथे आले. तों बावाजी रेणुसा सुताराचे सालेस गेला होता. तो तिकडून येत होता. मग तेथे भेट जालियावरी हरपोडीच्या व पाबेच्या सिवेपावेतो आले. तेथून पळो लागला. तेव्हा संकराजी ढमाल याणे मार्गावर धरून बांधून खंडोपंताकडे हजराहजीर पाठविला. मग हे भिकाजीस आणायासी गेले. तो भिकाजी भेटला नाही. पळोन गेला. त्याजवरी बावजीस खंडोपंतीं निरोप दिल्हा. बोली राहिली. त्याउपरी खासी आह्मास वेथा जाली. हिवें आली. हुक भरली. काही उपाय चालेना. वाडा बांधीत होतो तेथून उचलोन घरास आणले. तेव्हा दोन च्यार दिवस जाले. मग आह्मास बोध करणारानीं केला की घर बुडवावे ऐसे नाही. त्यावरून त्यास आणून खंडोपंतीं दो बिघीयाचा कागद लेहून दिल्हा. त्यावरी सिका केला. तो बाजेवरी दोघानीं धरून बैसविलें. पाठीस कान्होजी वेणुपराव हंसाजी मरळ याणी नीट बैसऊन सिकीयास शाही लाऊन देशपांडे याणीं हातीं दिल्हा. तेव्हा सिका बाजल्यावर करून दिल्हा. त्यास साक्ष राजश्री खंडोपंत खासनीस व रामाजी आपाजी व निळो आपाजी व भानजी बाजी देशपांडे व राघोजी राऊत प॥ प्रतापराव देशमुख सिलीबकर त॥ गुंजण मावळ यांच्या मोझ्या सिका करून दिल्हा असे. दोन बिघे सेत दिल्हे व त्याचा कतबा घेतला की, आपला आजा बालोजी याउपरी लागला तरी जाब करून देऊ. याउपरी आपली व आपल्या घरांतील वेथा बरी जाली. कोण्हा देवाधर्मास काही दिल्हे नाही. तेणेकरून वडिलांचा वाडा व खर्चवेच तो कामथाविसें रुपये दिल्हे ते उगवले नाही, अगर आह्मीहि घेतले नाही. यामुळे तीर्थरूप मृत पावले. समागम मातुश्रीनें सहगमन केले आणि दोन बिघे सेतहि गेले. येणे प्रमाणे हा करीना असे. आपल्यापासीं त्याची तकरीर हरनाक याणे लेहून दिल्ही होती. त्याची होय नव्ह न करितां, खडोपंतीं रामजी आपाजी देशपांडे हे पाठऊन घेऊन गेले. मग काही वेथा जाली नाही. त्यावरी दतोजी रेणुसा भिकाजीचा भाऊ सातारीयास जाऊन देवडीकडे लाग करून, सेरी अमानत करविली. सेरकर सेरी मोजावयासी निघाले. तेव्हा कोणी दिवाणचे कारकून नाहीत ह्मणून त्यास ते दिवसीं राहिले. मग तेच पहाटेस भिकाजी रेणुसा याणें फास लाऊन जीव दिल्हा. मग मोजणी राहिली. त्याउपरी माल जो जो फस्त केला होता त्याचे रुपये जाखा करून वारिले. सेरीच्या माथा रुपये ५० पनास दर वरसास ऊस लाऊन द्यावे ऐसा तह केला. त्यासी पाटील सेरी दखवीत नाहीत. तुफानास येऊन आह्मासी कजिया करीत आहेत. दताजी रेणुसा यानें अदाव घालून आह्माजवह चाकरीस राहिला. मग सेरीचे लचांड पडेल ह्मणून पळोन गेला. पुढे कितेक गोष्टी आहेत.

बी॥ बापुजी भास्कर देशपांडे त॥ कानदखोरे.''