Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ५०
१६२२ आश्विन वद्य २
(शिक्का फारसी)
माहाजर बतेरीख १५ माहे जमादिलोवल थळ
कसबे मसूर सुरसन ११०९ हजीर मजालस
राजमुद्रा | ||
रुद्राजी त्रिमळ देसपांडे ता। तारळे रुजू कृष्णाजी ताठे पटेल मौजे तासगाऊ ता। सातारा (निशाणी नांगर) रामसेटी विभूते का। भालवणी (निशाणी तागडी) संताजी पटेल मौजे चिखली मकाजी ढोग्या बाळनाक बिन राणनाक माग मौजे पुळज पा। मोहळ |
तिमाजी पाटील व सेखोजी पाटील जाधव काा उंबरज (निशाणी नांगर) मलोजी पटेल मुळीक कसबे सेळगाऊ अलीखान पिलाजी बल्लाळ कुळकर्णी मौजे कोर्टी सुभान नाईक बेरड लखमनाक बिन बाळनाक मांग मौजे वाहगाऊ |
सेख ईभराईम मुल्ला का। मसूर (निशाणी फारसी) रेखोजी पटेल करंडे का। सेळगाऊ बापूजी पटेल मौजे आरवी त्रिंबकजी पटेल मौजे वडोली निळेश्वर केरनाक मांग बिन निंबनाक मौजे वरकुटें काा मलेवाड माहालनाक बिन बुबनाक मांग काा मजकूर व सेळगाऊ |
या विदमाने केला माहाजर ऐसा जे होननाक बिन आबनाक माग मौजे खोडसी प्रा। कर्हाड लेहून दिल्हा माहाजर ऐसा जे पदाजी यादव याचा भाऊ गिरजोजी यादव हा चाकर दि॥ राजश्री राजाराम याकडे दरुनीमाहालीचा हवाला करून आहे तो सातारियावरी मुकामी असता त्याने आपणास विठोजी जाधव नाईकवाडी प्रा। कर्हाड या हाती बोलाऊ आपणास पाठविले त्यावरून आपण सातारियास गेलो गिरजोजी यादवास भेटलो याने सागितले की तुह्मी आणखी माग मेळऊन माहादजी जगदळा देसमुख पा। मसूर यासि जिवे मारणे तुह्मास आपण एक हजार रुपये व दोनी चावर इनाम देईन ह्मणऊन बोलोन आह्मास तुर्त खर्चाबद्दल रुपये २०० दीनी से दिल्हे आणि आह्मास निरोप दिल्हा त्यावरी आपण कसबेमजकुरास आलो माहादजी देसाई यासि मारावे तरी हे आपले मनी नव्हते ह्मणऊन हईगईवरी होतो परतु जाहाले वर्तमान आपण माहादजी देसाई यासि सागितले नाही त्यास परस्परे च कळले त्यावरून त्यानी आपणासी दस्त करून धरून आणून आदबखाना ठेविले आहे एणेप्रमाणे जाहाला अमल लिहिला आहे याउपरि आपण ए गोष्टीस मन घालून तरी दिवाणीचा गुन्हेगार असे व सदर्हू दोनी से रुपयाखेरीज काही घेतले नाही हा केला माहाजर सही वळी सुमार ३४ चवतीस रास