Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २६
श्री १६१५ आश्विन शुध्द ११
स्वस्ति श्रीराज्याभिषेकशके २० श्रीमुखनामसवत्सरे आश्विनशुध एकादशी भृगुवासरे क्षत्रियकुलावतस श्रीराजारामछत्रपति याणी समस्तराजकार्यधुरधर विश्वासनिधि राजमान्य राजश्री रामचद्रपडित अमात्य हुकमतपन्हा यासि आज्ञा केली ऐसी जे माहादजी जगदळे देशमुख तपे मसूर प्रा। कर्हाड याणे स्वामीचे सेवेसी विनति केली कीं, ता। मजकूरची देशमुखी आपले पुरातन वतन ते स्वामीने आपले आपणास मोकरर करून दिल्हे पत्रे दिल्हीं त्यास रा। सुदर तुकदेऊ याणी कथळा केला होता ते हि वर्तमान स्वामीचे सेवेसी विदित केलियावरी स्वामी कृपाळू होऊन ताकीदपत्रे हि देविली आपण आपले वतन अनभऊन असेन ऐशास मसूरतपाचे गाव पुरातन ५७ सत्तावन त्यास आदलशाचे कारकीर्दीस वीस गाव फूट गाव करून मोकासे दिधले होते मधे वतनाचे बाबे आदलशाहाचा फमान जाला तो वीस गाव देखील जाला नाही सततीस ३७ गावाचा च फर्मान जाला परतु आपणास सत्तावन गावीचा वतनाचा भोगवटा आहे पहिले इभराईम आदलशाचा फर्मान सत्तावन गावाचा आहे परतु स्वामीचे सेवेसी एउनु वर्तमान विदित केले तेव्हा पहिला फर्मान हाजीर नव्हता अलीकडलचा फर्मान होता त्याप्रो। आज्ञापत्र घेतलें पूर्वापार सत्तावन गाव आपले वतनाचे आहेती कैलासवासी स्वामीस देश हस्तगत जाला तेव्हा सदर्हू वीस गाव उबरजेखालें व तारगावखालें वोढिले त्या गावास यादवास स्वामीने उबरज-तारगाव-आउद या माहालाची देशमुखी दिल्ही आहे ह्मणून ते दखलगिरी करिताती तरी आपले तपियाखाली वीस गाव मोकाशास निराळे करून दिधले होते ते आपले आपणाकडे देविले पाहिजेती म्हणौन बहुता प्रकारे विनति केली ते ऐकोन तुम्हास हे आज्ञापत्र सादर केले असे वृत्तिवतनाचा मामला बरहक्क करून जिकडील तिकडे देउनु सुरक्षित चालवावे ऐसे आहे याकारणे माहादजी जगदळे व यादव यास गोतात पाठऊनु हमशाही गोत मेळउनु पूर्वापार वृत्त मनास आणून वीस गाव मसूरतपियाचे ऐसे खरे होईल तरी मसूरतपियाखाले देवउनु तेथील देशमुखीचे वतन माहादजी जगदळे यास चालवणे जरी मसूर तपाचे गाव नव्हेत ऐसे असेल तरी ज्या माहालाखाले चालताती तैसे चालो देणे वृत्तीचा मामला आहे मनसुफी बरहक्क करवणे आणि जिकडील गाव तिकडे देणे लाइनी नसता कथळा करील त्यास ताकीद करून कथळा नव्हे ते करणे जो काय निवाडा होईल तेणेप्रमाणे माहजर करउनु वर्तमान हुजूर लिहिणे तेणेप्रमाणे स्वामीची पत्रे सादर होतील जाणिजे बहुत लिहिणे तरी तुह्मी सुज्ञ असा
बार