Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २५
श्री १६१५ भाद्रपद वद्य ११
राजश्री सुंदर तुकदेऊ
गोसावी यासि
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य राजश्री राजा कर्ण दंडवत सु॥ सन अर्बा तिसैन अलफ तपे मसूर पा। कराड एथील देशमुखी पुरातन माहादजी बिन सुलतनाजी जगदळे याचे वतन पुरातन चालले आहे त्या वतनानिमित्य पूर्वी चंदीच्या मुकामी एऊन राजश्री स्वामिसनिध आपले वर्तमान सागितले आणि वतनानिमित्य सेरणी कबूल केली त्यावरी राजश्री स्वामीने तपेमजकूरचे वतन यास मर्हामत करून वतनाची पत्रे करून दिल्ही ते पत्रे घेऊन ते हि रा। रामचद्रपतास जवळी गेले तेही यापासून थोडेबहुत द्रव्य दिवाणात घेऊन वतन याचा यास दुबाला केला त्यास तुम्ही तपेमजकूर दे॥ कराडप्रातीची देसमुखी वतन आह्मास दिल्ही आहे ह्मणून ह्याच्या वतनास इस्कील केले याकरिता मशारनिले मागती चजीस एऊन राजश्री स्वामीस वर्तमान विदित केले त्यावरून आह्मास बोलाऊन राजश्री स्वामीने आज्ञा केली की तपेमसूरची देशमुख माहादजी जगदळे यास दिल्ही आहे एविशी मा। सुदर तुकदेव यास पत्र दिल्हे आहे तुह्मी आपली पत्रे देउन याचे वतन याचे स्वाधीन करणे तपेमजकुरीची देशमुखी यास दिल्ही आहे ह्मणून आज्ञा केली याकरिता तुह्मास हे पत्र लिहिले आहे तरी तपेमसूरची देशमुखी माहादजी जगदळे यास वौशपरंपरेने चालवावे ऐसा निर्वारूप राजश्री स्वामीने पत्रे दिल्ही आहेत तरी तुह्मी तपेमजकूरचे वतनास इस्कील अथवा खलील न करिता माहादजी जगदळे याचे स्वाधीन करून याचा मामला सुरक्षित चालवणे देशमुखीस हक्कलाजिमा व इनामती इसाफती जे आहे ते राजश्री स्वामीच्या पत्राप्रमाणे बिलाकुसूर चालवणे माहादजी जगदळे हे पुरातन सेवक एकनिष्ठ याचे चालवणे राजश्री स्वामीस व आह्मास बहुत च अगत्य तरी तुह्मी याउपरि कोणेविशी उजूर न करिता याचे वतन यास सुरक्षित चाले ते गोष्टी करणे सर्वथा कथळा न करणे या पत्राची प्रती लिहून घेऊन मुख्य पत्र देशमुखास परतोन देणे छ २४ मोहरम