Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ३८६
१५४० मार्गशीर्ष शुध्द १०
श्रीमद्गलसत्य नकल
श्रीमुदगळ
श्रीशक १५४० काळयुक्त नाम संवत्सरे मार्गशीर्ष शुध १० वार आदितवार त्तदिवसि रामेस्वरभट गोसावियासि देउजी बिन रुपाजी व लुमाजी बिन कान्होजी मोकदम व समस्त मुख्य व बारा ही बळुते मौजे आरवि ळेहोन दिधळे ऐसे तुह्मास देवाचीया फुळझाडाकारणे तुमचीया घरामागे गावाचे उतरभागि नजीक गावकुप जमिन खडसर सरगायरान पडि नेपतियाचि झाडे तेथे ऐसी आहेति ते जमीनिचा महसुळ अथवा नकत बाब ता। ठाणे व ता। देहाये काहि येत नाही मुतळ खडसर गायरान आहे जमिन बिघे २० विस गज शरायणी हे भोये तुह्मास श्री र्पण दिधळे असे तुह्मी विहरि पाडुन देवाकारणे फुळझाडे व ज्जो झाडझाडोरा व जे पिक होइल ते व उस केळी व निबाणिया हर जिनस जे ते भोईस पिकेळ ते तुह्मी देवाप्रण दिधळे असे सुखे किर्दि करवेह ते करुन सुखे घेणे आवलादि व अफळादि ळेकुराचा ळेकुरी दीधळे असे यासि अनसारिखे करु तरि श्रीअण असे व आमचे पुर्वज्जाचि आण व भाक आसे हे ळीहिळे सही
गोहि (नांगर)
विठळभट होसींग चिमणभट कोहकणे *