Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २९०
श्री १६३१ श्रावण वद्य १
साक्षपत्र हजीरमजालसी मुकाम मौजे आंबडे ता। उत्रोली ता। रोहिडखोरे बि हुजूर
राजमुद्रा
रोजश्री शामजी हरी नामजाद विष्णु रुद्र सभासद
सुभा प्रांत मावळ बराबरी स्वारी राजश्री
पंतसचिव
भिकाजी कृष्ण चिटनीस देवजी लिगोजी खटपनीस
सुभा मावळ सुभा मावळ
सकराजी ढगे मोकदम गोविंद नरसिह हरकारा बा।
बा। स्वारी रा। पतसचिव स्वारी रा। पतसचिव
गोत
सु॥ अशर मया अलफ कारणे जाले साक्षपत्र ऐसे जे मौजे माडरदेव प्रा। वाई व मौजे आबडे व बललु व नेरे ता। उत्रोली या गावात सिवेचा गरगशा होता ह्मणौन खोपडे देशमुख व माडरे मोकदम हुजूर राजश्री पतसचिवस्वामीजवळी जाऊन राजश्री सुभेदारास व समस्त गोतास आज्ञापत्रे घेऊन आले की सिवेवरी जाऊन सीव नजर गुजार करून हरहक निवाडा हुजूर लिहिणे त्यावरून रा। सुभेदार व समस्त गोत सिवेवरी येऊन श्रावणमासी खोपडियाने दिव्य करावे ऐसा निर्वाह करून हुजूर लिहिले त्याउपर श्रावणमास निघता च हुजुरून सकराजी ढगे यास हा। आज्ञापत्र आले की सिवेवरी जाऊन दिव्य घेणे खरा कोण खोटा कोण हे वर्तमान लिहिणे ह्मणौन पत्र आले त्यावरून राजश्री सुभेदार व समस्त गोत मौजे आबडे येथे येऊन खोपउे व माडरे आणून खोपडियापासून दिव्य घ्यावे त्यास अनसोजी व बयाजी माडरे याणी रदबदल करून दिव्य आपण करितो ह्मणौन मागोन घेऊन राजिनामा लेहोन दिल्हा त्यावरून श्रावण शुध द्वादसी सणवारी गोदनाक बिन भाननाक माहार मौजे माडरदेव याच्या हातास साबण लाऊन दोन्ही हात धुतले कृष्ण न्हावी मौजे खेडी बु॥ प्रा। सिरवळ याजकडून नखे काढून हाताची निशाणे लिहिली मग दोही हाती पिसव्या घालून लाखाटा केला कैदेत राखिला दुसरे दिवसी आदितवासी त्रयोदसी पहिला प्रहरी धोडउडाणाखाले बोरपेढा आहे तेथे आपली सीव आहे आहद कलकदरा तहद चोरधोडीनजिक पालाणा ऐसे बोलोन बोरपेडा माडरे जाऊन उभे राहिले तेथे राजश्री शामजी हरी सुभेदार पहिल्या प्रहरात सिवेवरी जेथे माडरे जाऊन उभे राहिले तेथे रा। सुभेदार व समस्त गोत बैसोन का। सिरवळचा लोहार जाणून त्याजकडून ऐरण ताविली माहार उभा करून हातीच्या पिसव्या काढून सात मडळे काढिली पहिल्या मडलात उभा करून हातावरी सेवल घालून त्यावरी सात पाने पिंपळाची ठेऊन त्यावरी लोणी घातले लोहाराने साडसे ऐरण धरून माहाराच्या हातावरी ठेविली सात मडले चालोन सिवेवरी बोल्या गवताचा भारा ठेविला होता त्यावरी टाकिली डोब जाला माहाराचे हाती पिसव्या घालून लाखाटा केला कैदेत ठेविला तीन रात्री होऊन चौथे दिवसी बुधवारी राजश्री सुभेदार व समस्त गोत बैसोन हातीच्या पिसव्या काढिल्या हात पाहाता माहार दिव्यास लागला
उजव्या हातास आगठ्यापासी डाव्या हातास मधल्या बोटा
मधले रेघेवरी फोड पावट्या पासी एक फोड व त्याचे सेजारी
प्रमाणे १ एक व त्या च संधीस एक फोड आला
बोटास पुढे लाहान फोड
२ दोन जाले
सदरहूप्रमाणे दिव्यास लागला खोटा जाला हे साक्षपत्र सही छ १४ माहे जमादिलाखर