Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २८९
१६३० ज्येष्ट वद्य ४
सलाम राजे शाहु यास की तुह्मी कृष्णाजी दादाजी प्रभु देशपांडिया यासमागमे आपली अर्जदास्त पा। त्यातील मजमून आमची चुलती व सर्व नौकर लोक मिळोन फिसात करून आह्मावर फउजा रवाना केल्या आह्मा बुडवावे आपण राज्य करावे असी चिती द्वेशबुधी धरून असे केले त्यास बादशाही हुकमाने देसी राज्यावर आलो तो हा प्रसग पडला त्यास श्रीवरे व शूरत्वेकरून लढाई केली तो बादशाईकृपेकरून फते पावलो व नौकरलोकास धरून नसेती केल्या बदोबस्ती करण्याचा क्रम चालला आहे हुकूम की मनुश जरबेत राखावे व रयतलोक याचे संरक्षण करावे व इनसाफ बराई खुद जातीने पाहावी बडे बुडवावी ह्मणजे धका नाही त्याप्रमाणे हुकूम चिती दृढतर धरून राज्यपध्दतीने हिंदुशास्त्राप्रमाणे चालत आहो ही खबर कळावी सबब मुदाम कृष्णाजी अर्जी देऊन वकिलाकडे पा। त्यास वकील मजकूर याणी हुजूर अर्जदास्त रसिद करून तुह्माकडिल नौकराचे मुखे साकल्य मजकूर शृत केला त्यास पेशजी फर्मान तुह्मास जमेदारीबदल मिळाला आहे त्याप्रमाणे मुलकाचा वगैरे बदोबस्त ठेऊन कायम जाला हा बहुत तुह्मास बादशाही कृपेने फायदा जाला हा संतोष मानीत आहो व मावळप्रांती शक्राजीनारायण पडत याणी जबरीने दादाजी नरस प्रभु देशपांडिया कुलकर्णी रोहिडखोरे व वेलवडखोरे प्रा। मावळ कृष्णाजी प्रभूचा बाप हा कदीम जमेदार असता त्याचे वतन घेतले व आणखी हि बहुत जमेदार व रयत लोकाच्या तसनसि केल्या ये बाबे पडत यास तुह्मी आणविले आसता न आले हिरकणी खाऊन मेले त्याचे नारबोपडत नोकरीस ज्यारी त्यास तुह्मी तो इनसाफीत नजर व दोबस्तीविसी इरादा ठेविला आहे येविसी प्रभूनी अर्ज केल्यावरून त्यास ज्याची जमेदारी कदीबमबपासून असेल ती अवलाद अफलाद चालवावी व राज्यात जुलूम जाहाला तो न्याय करून रयतेस सुख द्यावे व प्रभूचे वतन प्रभूकडे चालवावे प्रभु आपणापासी जोत्याजी केशरकर याचे दिमतीने हुजूर तुह्मासाठी तुमचे समक्ष नोकरी केली आहे तुह्मी नेक चालीने चालून बादशाहीकृपेने दौलतीची बडती करून घ्यावी येविसी रायभान वकील याजवळ हुकूम पेशजी जाला तो एकदर मजकूर लिहिला बादशाई लोभ विशेष जाणावा छ १७ रबिलावल सन ३ मुताबीक सन ११२०
(असल फरमान माहाराजापासी दिल्हा मराठी नकल बादशाहा मुनसीपासी केली ती हुजूर सातारमुकामी दाखऊन आपल्याजवळ नकल राहावी ह्मणून विनंती करून घेतली)