Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २७३
श्री १५७५ मार्गशीर्ष शुध्द ३
नकल
श्रीमंत राजश्री सीवाजी राजे महाराज साहेबाचे सेवेसी
दा। बा। यजितपत्र बाबाजी सिवदेक सोनटके गु।।स्ते दिमत दादाजी नरस प्रभु देशकुलकर्णी व गावकुलकर्णी ता। उत्रोली व ता। भोर ता। रोहिडखोरे सु॥ सलास खमसैन अलफ हुजूर केदारजी बीन नरसोजी व खडोजी बीन धर्माजी खोपडे देशमुख ता। उत्रोली याचा महजर गोत वगैरे माहाराजाचे समोर हाजरमजालसीत जाला कथला तुटून निमे निमे वतन उभयतानी खावे असे जाले त्यात मी लबाडी करून आपले बिकलम लिहिले की देशकुलकर्णी ह्मणोन घातले याची खबर खोपडे देशमुखानी हुजूर केली सबब मला आणोन राजगडी कैद करावेसे केले त्याजवर मी कबूल जालो की मी चाकर प्रभु देशकुलकर्णी याणी आपले घर भावाचे मुले आणून चौघा गोताचे व ठाणे सिरवळचे अमीनाचे मते नजराणा होनु देऊन घेतले आणि दोन्ही खोरीयाचे वतनास अधिकारी दादाजी नरस प्रभु देशकुलकर्णी व गावकुलकर्णी करून रोहिडखोरे व वेलवडखोरेचे वतन चालवीत असता मी लबाडी केली असे गोताचे व जमेदाराचे सरकारचे पारखीस आले मी बिकलम आपले नावे लिहिले ते खोटाई करून लबाडीने लिहिले ही चुकी मजकडून जाली मी चाकर वतनदार नव्हे हा गुन्हा मजकडून जाला याउपरी असी लबाडी केल्यास दिवाणाचा गुन्हेगार व गोताचा खोटा छ ३ मोहरम हे लेहून दिल्हे सही हस्तक्षर खुद
गोही
इ. इ. इ.
(याप्रमाणे कागद हुजूर लिहून दिल्हा त्याची नकल पुढे कामा येईल सबब दादोपत दिमत सरकार याणे दिल्हे सन मा।र)