Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)

                                                                                 लेखांक २७२ 

                                                                                                     श्री                                                   १५७५ श्रावण शुध्द ३


                                                                                               272

अज रख्तखाने नरसो धोडदेउजी हवालदार व मुदसदियान किले रोहिडा बु॥ दौलतहू बजानेबू ता। बालोजी पटेल कुढले मोकदम व नाइकजी पटेश्ल कुढले यमोकदम मोजे करजीये तर्फ मजकूर सु॥ सन सलास खमसैन अलफ तुह्मी हर दोजण किला येउनु अर्ज केला जे गोदनाक माहार महुडेकर किलेमजकूर हा दिवाणाचा चाकर असता अमचे बराबर ठाण्याहुनु दिवाणची सदरी ठाणगावर मारिला सबब येउनु कसाला गुजरला आमचे बाप भाऊ वडील व बिरादभाऊ धरुनु स्वारीचे लोकानी खाना मागितला त्याप्रमाणे लोकास बकरी माजूम वगैरे खाना देउनु नीट बदोबस्त करुनी खुसी केले त्याउपरी काही लोक निजले काही लोक रखवालीस बसले त्याणी गाऊमाहारास ताकीद केली जे दो पटेल मोकदम भाऊ बिराद फरजद नफर सारे चीजबस्त घर तुह्मा महाराचे हवाला केले असे यातील अफरातफरा हिलाहरकत जाल्यास तुमचे सारे गाऊमाहाराच्या गरदना मारू याप्रमाणे ताकीद करुनु सारे लोक निजले त्याउपरी अह्मी व आमचे बाप भाऊ बिरादर फरजद याणी विच्यार केला जे दिवाणचा ठाणगा आपले वडिलानी मारिला याबाबे आपल्या गरदाना मारितील हे खास दिसते आता आपल्या जाण्यास वाट आपले माहारापासी मागावी असा मनसुबा करुनु गाउमाहारास सला पुसिली तो गाउमाहार बोलिले जे आह्मी तुमचे जिवासाठी दिवाणचे गुनेगार होऊनु आपल्या लेकराफरजदासुध्दा गरदना मारुनु घ्यावया हा हिया आमचे हातुनु होत नाही असे सर्वानी सागितले त्याउपरी आमचे बाप व बिरादर भाऊ व फरजद यास जरब पडुनु गोदनाक माहार महुडेकर किलेमजकूराचा चाकर याजला भाकेत गवसुनु वचन घेतले जे आमचे सारे जीऊ वाचवणे त्याजवरुनु गोदनाक बोलिला जे माझी तर गरदान तुह्मा बाबती मारितील त्यास मी कबूल आहे परतु माझा फरजद अरजनाक यास काय तुह्मी आपले वतनापैकी वतन देता ते तुह्मी आपले पूर्वज स्मरुनु कबूल केल्यास पार करुनु देतो त्याजवरुनु ते वेळी गोदनाकास वचन दिल्हे की आह्मी आपले इनामपैकशी रु॥ ३॥6 तीन येक पैस व खालिसापैकी वहाण काबळे बरकस रान व खाचरसुधा देऊ व गाऊमहाराचे इनामपैकी हिसा अठवा रकम टका ।. रुके बारा व हडकी हडवळ्यात हिसा अठवा व बइत्यात हिसा अठवा व घर गाऊमहाराचे वेळी बारा घरटका व वणह्मैस पालक व गाऊमाहाराची तरालकी दरोबस्त तुजला व तुझे भाऊ बिरादर फरजंद याजकडे अवलाद अफलाद चालऊ या वचनास जो आमचे वशातील भाऊ व बाप फरजद व बिरादर भाऊ नव बिगर हक बिरकत करील त्यास पुर्वजाची व श्री माहाकाळाची शफत असे त्याप्रमाणे ते वेळी इनाम जाले ते आह्माकडून गोदनाकास मिळावे तो गोदनाक आमचे बाबती गुन्ह्यात येउनु दिवाणानी ठार मारला असा गोदनाक आमचे वडिलाचे उपयोगी येउनु आमचे जिऊ वाचविले ते वचन आह्मी गोदनाकाचे फरजदाकडे चालविणे जरूर या बाबे किला येउनु अर्ज केला हा दिवाणानी आमचा अर्ज खातरेस आणुनु अर्जनाक गोदनाक याचा फरजद यास आमचे वडिलाचे व आमचे वचनाप्रमाणे गाऊ महाराकडुनु करुनु दिल्हे पाहिजे याजवरुनु तुमचा अर्ज खातरेस अणुनु तुमचे गुन्हे माफ दिवाणातुनु तुह्मा मोकदमास माफ करुनु तुमचे अर्जदास्ताप्रमाणे धाकनाक वलद जाननाक माहार याजला पुरसीस केली जे हर दोजण मोकदम याचे बोलणे सदरहू तुजला कबूल असल्यास इमाने कबूल होणे त्याजवरुनु धाकनाक मजकूर बोलिला जे मोकदम पटेल त्याचे इनाम गोदनाकाजवळ जाले ते च माझे पुर्वजाचे व माझे व माझे फरजद वशासुधा जाले मोकदमाचे वचनाप्रमाणे अर्जनाक वलद गोदनाक यास माझे वतनापैकी वतन अठवा हिसा व व घर यासुधा घ्यावे त्याजवरुनु तुजला पुरसीस केली जे तू कबूल जालास याचे इनाम करणे त्याजवरुनु तू इनाम केलेस जे माझे वौशी जो तरालाचे वतनास व मोकदमाचे वचनास हिलाहरकत करील त्यास पूर्वजाची शफत व माझे जातवले देवाची व पाहनीचे देवाची शफत आमचे भाऊ बिरादर फरजद व वौशिक यास असे त्याजवरुनु तीन बिनादरा खातरेस आणुनु गोदनाक याचा फरजद अर्जनाक याजला तुमचे कबुलाती अजदास्तीवरुनु बहाल दिवाण करुनु दिल्हा जातो जे मोकदम याचे इनामपैकी रुके 6 ३ 6 तीन एक पैसा व खालिसापैकी वहाण काबळ्याबदल वरकस रान व खाचर याप्रमाणे व गाऊ माहार याचे माहारकींपैकी इनाम रकम टका । बारा रुके हिसा आठवा व हडकी हडवला व मढ्यात व दाईत्यात वगैरे हिसा आठवा व दरोबस्त तरालकी व वेलीचा घर व घरटका व वण व पालक व मानापैकी माहाराचे वतनापैकी एक मान देऊनु चालवावे असे मोकदम व गाउमहार याचे अर्जावरुनु दिवाणातुनु बहाल करुनु दिल्हे असे तरी ही सनद अर्जनाक वलद गोदनाक याचे दुमाला करुनु चे फरजदाचे फरजद अवलाद अफलाद तरालकाचे वतन माहारपणाचे वगैरे बाबती माहारपणाच्या दरसाल ताज्या सनदेचा उजूर न करणे या सनदेची तालिक लिहून घेउनु मुख्य सनद अर्जनाक वलक गोदनाक तराल याजपासी फिरोन देणे जाणिजे छ १ रमजान मोर्तब सुद           (शिक्का)