लेखांक ४५३
श्री १६७७ आश्विन वद्य ६
आज्ञापत्र राजश्री सदाशिव चिमणाजी ता। मोकदम कसबा चाकण प्रां। जुनर सुहुरसन सीत खमसैन मया व अलफ वो। राजश्री कृष्णभट ब्रह्मे चाकणकर हाली वस्ती मौजे इंदुरी ता। चाकण याणी सुभा पुण्याचे मुकामी एऊन विदित केले की कसबेमजकुरी नाणेक थळ खंडी ९ पैकी खंडी ३ तीन एकूण चावर १ एक आपला पुर्तन इनाम आहे वीस पंचवीस वर्षे भोगवटा नाही यापूर्वी आपणाकडे भोगवटा चालिला आहे इनामपत्रे व चकनामा आपणाजवळ आहे तो मनास आणून आपला इनाम आपले स्वाधिन करावयासि करणे कुरास आज्ञा केली पाहिजे ह्मणौन तरी वेदमूर्तीचा इनाम चाकनाम प्रमाणे चालता करून वेदमूर्तीच्या स्वाधिन करणे भटजीचा आजतागाईत कोण्ही वाहून खादला त्याची तहकीकात मनात आणावी लागते याकरिता तुह्मी कुलकर्णी घेऊन देखत आज्ञापत्र सुभा एणे दिरंग न करणे जाणिजे छ १९ माहे मोहरम