लेखांक ४०५
१५५० भाद्रपद शुध्द १४
अज दिवाण ठाणे का। पाटस पा। पुणे ता। हुदेदारानी अजहती मुकासाई व मोकदमानी मौजे वडिगौ का। मा। सु॥ तिसा इसरैन अलफ रामेस्वरभट बिन नारायणभट मोजे आरवी मुदगल यासी इनाम मौजे मजकूर चावर कास रुके .।. आहे नखतयाती व बाजे पटिया ता। देहाये व ता। ता। ठाणे कुल बाब व वेठबिगारी व फर्मासी नखत व ऐनजिनस कुल बाब कुल दुमाला केले असे दुमाला कीजे दर हर साल ताजे खुर्द खताचा उजूर न कीजे याची चावराची उचापती आजी ता। जाहाली असेल ते फिराउनु दीजे पायपोसी मा। पैकी उचापती देणे
तेरीख १२ माहे मोहरम