लेखांक ४०३
१५५० भाद्रपद शुध्द १०
अज रखतखाने राजश्री कृष्णाजी राजे भोसले साहेबु दामदौलतहू बजानेबु हुदेदारानी मौजे वडिगाऊ पा। पुणा बिदानद सु॥ तिसा इशरैन अलफ दा। रामेस्वरभट बिन नारायणभट मौजे आरवी मुदगल यासि इनाम मोजे मजकुरी चावर कास रुके .।. आहे नखतयाती व बाजे पटिया ता। देहाये व ता। ठाणे कुल बाब व वेठबेगारी व फर्मासी नखत व ऐन जि॥ कुल बाब दुमाला केले असे दुमाला कीजे दर हर साल ताजे खुर्द खताचे उजूर न कीजे मोर्तब सुद (शिक्का षटकोनी) याची चावराची उचापती आजी ता। जे जाहाली असल ते फिराउनु देणें पायपोसी मा। पैकी उचापती देणे मोर्तबु (शिक्का षटकोनी)
तेरीख ८ माहे माहे मोहरम
मोहरम