लेखांक ३९७
१५४५ फाल्गुन वद्य १३
अज रखतखाने राजश्री विठोजी राजे बजानेबू कारकुनानी प्रगणे सिरवळ बिदानद सु॥ आर्बा इसरीन अलफ रामेश्वरभट व चिंतामणीभट उपाध्ये हुजूर मालूम केले जे आपणास संकल्पाची रात जकाती पा। मा।वरी दिधली आहे बेरोज आदा केली नाही ह्मणौनु मालुम केले तरी सकल्पाचे वरातेस दिरीग लावणे काय तुरूस आहे आता बा। वरात आदा कीजे मोर्तब
तेरीख २६ माहे जमादिलोवलु
जमादिलोवलु