लेखांक ३९६
१५४४ फाल्गुन वद्य १३
रुजू निगावान
मा। हुदेदारानि मौजे बेळवडी ता। कर्डी यास मशहूरर प्रती नरसो दामोदर हवालदार व कारकून देहाय पा। पांडियापेडगौ सु॥ सलास इशरैन अलफ बा। खु॥ रा। छ २८ माहे रबिलाखरु साधर जाले तेथे रजा जे बो मुदगलभट बिन कृस्णभट सो। पुणे हुजूर येउनु मालूम केले जे आपणास इनाम बदल धर्मादाउ जमीन चावर एक गज सराइनी १
दर सवाद मौजे बेलवडी ता। मजकूर पेसजी खुर्दखत सादर आहे जे जमीन मेजून हद महदूद घालूण देण यावरी आपण माहालास गेलो माहाळीचे कारकुनास साहेबाचे खुर्दखत दाखविले यावरी कारकून जमीन मेजून प्रज बाबाजी मुलाना मुजेरी मौजे मजकूर प्रज नेमून दिधळी आहे ये बाबे कारकुनी आपणापासी अर्जदास लेहोनु दीधली आहे तरी स्वामी धर्मपरायण आहेती येणेप्रमाणे खुर्दखत दीधले पाहिजे दरीबाब सरंजाम होय मालूम जाहाले तरी भट गोसावियास इनाम बदल धर्मादाउ जमीन चावर एक १
गज सरानी यास प्रज बा। अर्दास छ ४ माहे रबिलाखर बाबाजी मुलाना मुजेरी मोजे मजकूर नेमून दीधला असे दुमाले कीजे अवलाद अफलाद चाळवीत जाइजे दर हर साल ताजे खुर्दखताचा उजूर न कीजे तुह्मी तालीक घेउनु असेली इनामदार मजकुरापासी फिराउनु दीजे तकरार फिर्यादी येऊन ने दीजे ह्मणौनु रजा रजेबरहु(कू)म अमल कीजे
तेरीख २६
जमादिलोवल