लेखांक ३९५
१५४४ फाल्गुन शुध्द ८
सके १५४४ दुंदभी नाम सवतछरे फालगुण सुध अस्टमी ८ वार गुरुवार सु॥ सलास इसरईन अलफ तेरीख ७ माहे जमादिलोवर ते दिवसी राजश्री रामेशभट व राजश्री चिंतामणीभट गोसावी यासि राजश्री खेलोजीराजे व राजश्री मंबाजीराजे व राजश्री नागोजीराजे व राजश्री परसोजीराजे व राजश्री त्रिंबकजीराजे व राजश्री ककाजीराजे लिहुनु दिधले ऐसे जे तुह्मापासी राजश्री ताबाई आवाने ठेवणे ठेविले होते बितपसील
नख्त एकविससे होनु सोने एकसे आठ तोळे
२१०० १०८
हे तुह्मी आमचे आह्मासी खडकीस आणौनु दिधले पैकी मालबा रायाचा वाटा मालबासी देउनु वाटे सा आमचे आह्मासी पावले बितपसील
नख्त अठरासे १८०० सोने तोळे नऊ ९०
एणे प्रमाणे आह्मासी पावले तुह्मासी व आपणासि अर्था अर्थ समंध नाही
गोही
एकोजी जैतजी भोसले भिकाजी मोहिते
मकुंद गोपीनाथ पत्रप्रमाणे साक्ष तिमाजी मोहिते