लेखांक ३८७
१५४० पौष शुध्द १०
अज रखतखाने राजश्री कृष्णाजी राजे साहेब दामदौलतहू बजानेब हुदेदारानी हाल व इस्तकबाल व मोकदमानी मौजे वडिगौ कर्याती पाटस पा। पुणे सु॥ तिसा असर अलफ रामेस्वरभट बिन नारायणभट सो। मौजे आरवी मुदगल हुजूर एउनु मालूम केले की आपणास इनाम जमीन चावर वाहातिकास देखील मळै रुके .।. बारा देखील नखतयाती व बाजे पटिया व वेळी बेगारी दर सवाद मौजे मजकूर प्रज माहाद पाटील ठोबरा बमा भोगवटे वजिरानी कारकीर्दी दर कारकीर्दी ता। सन समान चालिले आहे हाली मौजे मजकूर साहेबास मुकासा अर्जानी जाला असे माहाली कारकून ताजे खुर्द खताचा उजूर करिताती ह्मणउनु मालूम केले मालूम जाले रामेस्वरभट बिन नारायणभट यास सदरर्हू इनाम भोगवटे वजिरानी कारकीर्दी दर कारकीर्दी सालाबाद ता। सन समान तसरुफाती चालिले आहे तेणेप्रमाणे दिधले असे दुमाला कीजे दर हर साल ताजे खुर्द खताचा उजूर न कीजे तालीक घेउनु असेली इनामदारास फिराउनु दीजे मोर्तबु
तेरीख ८ माहे मोहरम