लेखांक ३६५
श्री २६११ आषाढ शुध्द द्वितीया
पत्र नियत पारतोसिक मा। येसजी कंक सरनोबत व कृष्णाजी येसजी कंक पदाति नायक शक १२ क्रोधननाम संवत्सरे आषाढ शुध द्वितीया भोमवासर सु॥ सीत समानीन अलफ मा।निलेनी व कृष्णाजी कंक मा।निलेचे पुत्र यां दोघानी फोंडाचे स्वारीस फिरंगी यासि गाठी पडिली तेव्हा बहुत कस्त केली आणि गनीम मारून काढिला ते वख्ती दोघाला हि जखमा लागोन चकचुर जाले कठीण जखमा राजश्री स्वामीनी दृष्टीने पाहिल्या आणि घरासी जावया आज्ञा दिल्ही त्यावरी कृष्णाजी कंक याच्या जखमा फुटोन घरी मयत जाला हाली येसजी कंक हे हुजूर येऊन आपले वर्तमान विदित केले त्यावरून स्वामी कृपाळु होऊन हे कामाचे मर्दाने स्वामीकार्यावरी तत्पर आणि याचा पुत्र हि स्वामिकार्यावरी मयत जाला फोडाचे बकसीस द्यावयाचे होते ह्मणौन छ मजकुरी पारितोषिकाची माईन केली होन पादशाही बेरीज २०००
ए॥ दोनी सहस्त्र होन रास
खासा येसजी कंक सरनोबत कृष्णाजी कंक मा।निलेचे पुत्र स्वामिकार्यावरी
हौन १००० पडिले ह्मणौन दिल्हे होन पा। १०००
एणेप्रमाणे एक साला ये वर्षी पारितोसिक द्यावयाचा नियत केला असे लेखनालंकार
तेरीख ३० रजब
सु॥ सीत
बार
सुरु सुद बार