लेखांक ३६३
श्री
जेधे बांदल याचे जुंज सिवेचे खटले व नदीबदल जाले त्याचा करीणा जेधे याणी चापजी नाईक बांदल याचा नांदगावाजवळ मोडून डोगरास लाविले त्यास कृष्णाजी नाईक याणी बाजी प्रभु देशपांडे ता। हिरडसमावळ यासी बोलावून विचार करून मग दिपाई आवाचे पाईची बेडी तोडून मग दिपाई आवा याणी स्नान करून कृष्णाजी नाईक यास व बाजी प्रभूस वोवाळून यशवत होणे असे बोलून बाजीबावास घोडा बसावयास दिल्हा राजश्री कृष्णाजी नाईक संभु प्रसाद घोड्यावर बसले मग कासारखिडीस ठेऊन बाबाजी पोलास आज्ञा केली जे बाबाजी मामा पाड पाहाणे यात पाड पाहिला तो ++ तेचा निघाला तेव्हा चापजी नाईक यास जमावासुधा बोलाविले नादगावाजवळ वड थोरला होता त्याखाली जेधे ठेऊन नदी पाठीसी घालून बैसले होते तेव्हा सर्व जमाव बादलाकडील एक जागा होऊन जमावास कडवीच्या वर्या वाटून देऊन चालून घेतले जुज जाले तेव्हा जेधे मोडून कारीपावेतो नेले गाव लुटून पस्त केला राणीवसा मात्र राखिला तेव्हा माघारे मुरडून चालले तेव्हा कृष्णाजी नाईक याचे डोईचे मुडासे आमलाच्या मदे झोटधरणीत पडले होते ते बाजी प्रभु याणी याद धरून घोडियावरून उचलून तोबरीयात घातले होते तेव्हा कृष्णाजी नाईक बोलिले जे बाजी प्रभू एक दोन लढाया जाल्या परतु आज फते जाली जेधोजीने शीर मात्र नेले तेव्हा बाजी प्रभु याणी उत्तर दिल्हे जे तुह्मी बारा मावलात यशवंत आहा तुमचे इतर काम होईल असे ह्मणौन घोडीयावरून उतरून तोबरियातून मुंडासे काढून दिल्हे तेव्हा मुंडासे बांधून मग बाजीबावास पोटासी धरून नाईक बोलिले जे बाजी प्रभु तुह्मी शर्थ केली