लेखांक ३६२
श्री सहश्राय चिरंजीव राजश्री सिउबास व सुभानजीस बाजी सर्जाराऊ देसमुख ता। भोर किले रोहिडा आसिर्वाद उपरी मा। हा। साहेबास अर्ज लि॥ आहे तो पावता करुनी जाब घेउनी पाठविजे व माहाली होन दाहा कारकुनी मागितले आहे तरी ये बाबे रा। स लिहिले आहे त्याची भेटी घेउनी हुजूर अर्ज करुनी रोखा मागोन पाठविजे अमच्या हकात होन ४५ धरिले आहेती आणि मागती तगादा करितात तरी देसकुळकर्णी याचे इनामती खडणीमधे मजुरा घेत ऐसा रोखा मागोनी पाठविजे बुबुचा समाचार पाठविजे हा आसिर्वाद
दायकोजी कृष्ण बाबाजी कृष्ण आसिर्वाद -------- साहेबाची आमची मुलाखती जाहाली सरजामी नाही कळले पाहिजे