लेखांक ३६०
श्री १६२९ पौष शुध्द ३
मशहुरल अनाम मताजी जेधे देशमुख ता। रोहिडखोरे यासि बहिरो मोरेस्वर प्रधान आसिर्वाद सु॥ सन समान मया अलफ तुह्मी दोनी पत्रे पाठविली ती पावली राजश्री स्वामीचे दर्शन जालिया उपरि आपणास काय आज्ञा ह्मणुन लिहिले तरी तुह्मी ह्मणजे वतनदार लोक राजश्री स्वामी ए प्राते आलेवरी हे प्रसगी तुह्मी सर्व प्रकारे इमाने इतबारे वर्तोन स्वामीचे सेवेसी रुजू असावे हे विहित असे आह्मी हुजूर आहो तुह्मास समाधानपत्रे लेहोन पाठविली आहेती आणि हुजूर दर्शनास बोलाविले असे त्यासी सांप्रत राजश्री शंकराजीपतास देवाज्ञा जाली ह्मणून तुह्मी हुजूर यावयाविसी अनमान कराल तरी + + + सा न करणे पत्र पावता च हुजूर एणे तुमचे चित्तानरुप सर्व हि तुमचे अनकूल करून चालऊन ए विसी समाधान असो देणे जाणिजे छ १ सौवाल आज्ञा प्रमाण