लेखांक ३५९
श्री १६२१ भाद्रपद शुध्द १०
स्वस्ति श्री राज्याभिषेक शके २६ प्रमादीनाम सवत्सरे भाद्रपद शुध दशमी गुरुवासरे क्षत्रियकुलावतस श्री राजाराम छत्रपति याणी समस्त राजकार्यधुरधर विश्वासनिधी राजमान्य राजश्री रामचद्र पडित अमात्य हुकुमतपन्हा + + यासि आज्ञा केली ऐसी जे साप्रत सर्जाराऊ जेधे देशमुख ता। रोहिडखोरे याणी हुजूर विनतीपत्र पाठविले तेथे आपला उबार काही उरला नाही तरी स्वामीने च्यार गाव कबिला ठेवायास दिल्हे पाहिजेत ह्मणौन लिहिले ऐसियास सर्जाराऊ या राज्यातील कदीम त्याचे चालवणे अगत्य यास्तव हें पत्र लिहिले असे तरी तुह्मी त्याकडील सरजाम काय कैसा करून दिल्हा आहे तो हिला + + + + चालऊन ते सुखरूप राहात ऐसी गोष्टी करणे बहुत लिहिणे तरी तुह्मी सूज्ञ असा