लेखांक ३५८
श्री १६२९ आषाढ वद्य ६
स्वस्ति श्री माहाराज राजश्री शाहुजी राजेसाहेब याणी राजश्री मताजीराऊ जेधे देसमुख तो। रोहिडखोरे यासि आज्ञा केली ऐसि जे स्वामीचा भाग्योदयप्रसंग होऊन दक्षणप्रांते येणे जाले सांप्रत स्वामीचा मुकाम मौजे चोरवड प्रा। उतराण प्रा। खानदेश येथे जाला पुढे कुच दर कुच येईजत आहे ऐसियास तुह्मी पुरातन स्वामीचे सेवक एकनिष्ठ अहा या प्रसंगी स्वामीच्या दर्शनास येऊन आपले सेवेचा मजुरा करून घ्यावा ऐसे आहे तरी स्वामीचे येणे समीप होता च आपले जमावानसी येऊन भेटी घेणे भेटीनंतर स्वामी तुमचे उर्जित विशेषाकारे करितील ++ खातीरजमा राखोन लिहिलेप्रमाणे वर्तणुक करणे जाणिजे छ १९ रबिलाखर सु॥ समान मया अलफ