लेखांक ३५७
श्री १६२४ चैत्र वद्य १२
देशमुख ता। रोहिडखोरे यासि आज्ञा केली ऐसी जे ++ विनतीपत्र छ १६ जिलकादचे पाठविले ते छ २३ रोजी प्रविष्ट जाले आपणास इनाम गाव आहेत तेथील ती वर्षी इनामपटी दिवाणात द्यावी ऐसा कैलासवासी राजश्री स्वामीनी तह केला होता आणि हाली दर साल इनामतीची तिजाई वसूल राजश्री रामचंद्रपंडित अमात्य घेतात तरी पारपत्य करावया आज्ञा केली पाहिजे ह्मणून लिहिले ते विदित जाले ऐसियास मावलप्रांती सार्या वतनदारास तह केला आहे त्याप्रमाणे तुमचा हि इनाम गावाचा तह चालत आहे त्यात नवे काही करिता येत नाही व मोजे आंबवडे आपणास इनाम आहे तेथे बाजार भरतो त्याचा हासिल किले विचित्रगडकरी घेऊन जातात तरी येविशीं पारपत्य करावया आज्ञा केली पाहिजे ह्मणून लिहिले त्यावरून विचित्रगडकरी यांस आज्ञापत्र सादर केले आहे तयाउपरी बाजारच्या हासिलासीं कथला करणार नाही तुह्मीं स्वामीचे पायासी एकनिष्टे राहून र्ता। मजकूरची लावणी सचणी करून कीर्द मामुरी करणे निदेश समक्ष
रुजू सुरुनिवीस
सुरु सुद