लेखांक ३४९
श्री १६१३ भाद्रपद शुध्द २
स्वस्ति श्री राज्याभिषेक शक १८ प्रजापतिनाम सवत्सरे भाद्रपद शुध द्वितीया मंदवासर क्षत्रियकुलावतस श्री राजाराम छत्रपति याणी मा। सर्जाराव जेधे देशमुख व देशकुलकर्णी व गावकुलकर्णी मोकादम व चौगले व बाजे व सेटे माहाजन तपे रोहिडखोरे यासि दिल्हे अभयपत्र ऐसे जे तुह्मी स्वामीसनिध चजीचे मुकामी येऊन विदित केले की तपे मजकूरचे वतनदार लोक व आपण रयत देखील स्वामीच्या पायासी एकनिस्ट आहेत तरी स्वामीने कृपाळु होऊन वतनदारास वतने पहिले निजामशाही व आदीलशाही याचे कारकिर्दीस चालत होती तेणेप्रमाणे चालवायाची आज्ञा करून अभयपत्र देविले पाहिजे ह्मणोन तरी तुह्मी स्वामीच्या पायासी एकनिष्ट आहा या गोष्टीवरून स्वामी तुह्मावरी सतोषी आहेत त्या प्रातीच्या राज्याच्या कार्यभागास स्वामीने राजश्री रामचद्रपडित अमात्य व राजश्री शकराजीपत सचिव ठेविले आहेत त्यावरी मखत्यार आहे तेही तुमचे वर्तमान मनास आणून वतनाचा निर्वाह करून सनदा दिधल्या असतील त्या स्वामीच्या च आहेती तेणेप्रमाणे स्वामी चालवितील आपले समाधान असो देणे मावलप्राती राजश्री शकराजीपडित सचिव याचे दिमतीचे मुलकात आहे याकरिता तुह्मी त्याचे आज्ञेप्रमाणे वर्तणूक करित जाणे आणि स्वामीकार्य करून आपला मजुरा करून घेणे पुढे स्वामी त्या प्राते येतील तेव्हा तुमचे उर्जित करितील अभय असे जाणिजे निदेश समक्ष
रुजू
सुरु सुद बार