लेखांक ३४८
श्री १६१२ वैशाख शुध्द ७
स्वस्ति श्री राज्याभिषेक शके १६ प्रमोद संवत्सर वैशाख शुध +++ बाजी सर्जाराऊ जेधे देशमुख व देसकुलकर्णी +++ तपे रोहिडखोरे यासि राजाज्ञा ऐसी जे x x चे विशी नाइकजी जेधा बि॥ देसाई हुजूर येउनु विदित केले की आपल्या वतनाचा हकलाजिमा इनाम व इसाफती चा गाव कारकिर्दी अलशाहापावेतो चालत होते त्यावरी साहेबाचे कारकीर्दीस बटाईचा तह जाहला त्यामुळे आपले इसाफतीचा + + चा राजभाग गला दिवाणात होउनु हकाची मोईन नख्त व ++ करून दिल्ही तेणेकरून आपला औकात चालिला नाही हकाची मोईन दिवाणातून करून दिधली तेणेकरून आली हैरानगी च जाहली अनवस्त्राची ते हि विपती जाहली औरंगजेब स्वामीच्या राज्यावरी चाली केली राजश्री छत्रपतिस्वामी रायजडीहून कर्नाटकप्रांते गेले रायगड व वरकड हि किलेकोट गनिमासी सामील होउनु फिसाती केल्या त्याबराबरी आपणास हि च्यारी दिवस वर्तावे ऐसे जाहले परंतु आपण हि स्वामीच्या पायासी एकनिष्टेने वर्तावे हा च निश्चय करून होतो स्वामी करनाटक प्रांते गेलियावरी तिकडे विजय केला आपण वतनदारलोक एकनिष्ट सेवा करुनु दाखवावी हमणउनु किले विचित्रगड गनिमापासून घेतला व देश हि सोडविला पुढे हि जमाव करून गड कोट व देश गनिमापासुनु घेतो परंतु स्वामीने कृपाळु होउनु पेसजी आपला हक चालत होता तेणेप्रमाणे देखील इसापतीचे गाव चालविले पाहिजेत ता। मजकूरीची लावणी सचणी करून व स्वामीसेवा एसनिष्टपणे करून ह्मणउनु विदित केले त्यावरून ++ चा हक व इनाम व इसाफतीचा गाव तुह्मास देविले असेत पेसजी कारकिर्दीप्रमाणे घेत जाणे ता। मजकूरीची लावणी करून दस्त आकारून सदरहूप्रमाणे घेत जाणे ता। मा।रीचे गाव लावणी करून दस्त आकार होत जाईल त्याप्रमाणे लागल्या दस्तावरी हकाची मोईन बैसउनु घेत जाणे छ ५ साबान सु॥ सन तिसैन अलफ आज्ञा प्रमाण
सुरु सुद बार