लेखांक ३४१
१६०७ ज्येष्ठ वद्य २
राजश्री बाजी सर्जाराऊ देसमुख ता। रोहिडखोरे गोसावी यासि
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य श्रीा बाजी घोलप हवालदार व कारकून किले पुरंधर जोहार अनेक आसिर्वाद सु॥ साब समानीन अलफ पत्र पाठविले पाऊन वर्तमान कलो आले लिहिले की आपल्यास बहुत च फार अटक केली होती त्यास हुनरे च बाहेर पडिले आता काय विचार करावा तो लिहिला पाहिजे ह्मणौनु लिहिले कळो आले उत्तम गोष्टी बरी च केली आता राजश्री छत्रपतिस्वामीचे भेटीस जाउनु आपले उर्जित करून घेतले पाहिजे राजश्री चे दरशण होता च बरीच सरजमी होईल जाणिजे येविशई बहुत लिहिणे तरी विवेकी असा कृपा असो दिल्ही पाहिजे रा। छ १५ रजबू हे विनती