लेखांक ३२२
श्री
राजश्री दादाजी प्रभु गोसावी यासि अखंडितलक्ष्मीआलंकृत राजमान्यश्रीा मानसिंग मोरे सेनापति रामराम उपरी तुह्मी पत्र पाठविले प्रविष्ट होऊन वर्तमान कळो आले कृतीस आलेत उतम गोष्ट केली तुमचेविशी रा। मताजी सर्जाराऊ यास हि लिहिले आहे कृष्णाजी प्रभु आह्मापासी आहेत राजश्रीचे दर्शन जाले याउपरी तुमचे साह्यतेचा जो विचार असेल तो केला जाईल आपले समाधान असो देणे जाणिजे छ १७ सवाल हे विनंती