लेखांक ३२१
श्री
राजश्री मताजी सर्जाराऊ जेधे देसमुख ता।
रोहिडखोरे गोसावी यास
अखंडितलक्ष्मीआलंकृत राजमान्य श्रीा मानसिंग मोरे सेनापति रामराम उपरी येथील क्षेम जाणून स्वकीय कुशल लेखन केले पाहिजे यानंतर तुह्मी पत्र पाठविले ते पावले लिहिला अभिप्राय कलो आता रा। नागोजी जेधे आपणाजवळी चाकरी करीत असता येथे चौथाई व हकाची तिजाईचा वसूल आपणाजवळून घेताती ऐसियास प्रसंगी रदबदल करून दोनी सनदा घेऊन पाठऊन दिल्या पाहिजेत ह्मणून कितेक विस्तारे लिहिले तरी राजश्री स्वामीची व आमची कालि बुधवारी भेटी जालियाउपरी त्या गोष्टीचा प्रसंग एक दोन दिवसात करून पाठऊन देऊन तोवरी तुह्मी वसूल एकदर न देणे रा। दादाजी प्रभु ह्मातारपणी तुह्माजवळी आले आहेत त्याच्या सांभा (ळा)स अंतराये न करणे बहुत काय लिहिणे कृपा असो दिजे हे विनंती