लेखांक ३२०
श्री
राजश्री मताजी सर्जाराऊ जेधे गोसावी यासि
अखंडितलक्ष्मीआलंकृत राजमान्य श्रीा मानसिंग मोरे सेनापति रामराज विनती उपरी राजश्री कृष्णाजी दादाजी वतंदार वतनानिमित्य तुह्माजवळी आहेत ऐसियासि पोटनिमित्य सेवा आह्मापासि करिताती ऐसे असता तुह्मी यांच्या वतनाचा हि कथळा वारीत नाहीत आणि घराचे हि विषई घसघस करिता तर हे गोस्टी उतम नाही सर्वस्वे याचे साहित्य करणे आणि समापधानपूर्वक राहाणे नाहीतर दरवर लाबे ते न करणे जाणिजे छ १४ रजब