लेखांक ३१८
श्री
राजश्री रायाजी जाधव गोसावी यासि
अखंडितलक्ष्मीआलंकृत राजमान्य श्रीा खंडो बलाळ रामराज उपरी येथील कुशल जाणून स्वकीय लिहिणे यानंतर रा। सेनापतीनी आह्मास तुह्माकडे २५० अडीच से रुपयाची वरात दिल्ही प्रस्तुत स्वारीहून आले आहा याकरिता तुलाजी निकम पाठविला आहे तरी तुह्मी सदरहू अडीच से रुपये याचे पदरी घालून पाठऊन देणे अनमान न करणे जाणिजे बहुत काय लिहिणे