लेखांक ३१७
श्री १६३६ माघ शुध्द ७
राजश्री मताजी सर्जाराव जेधे गो।
अखंडितलक्ष्मीआलंकृत राजमान्य श्रीा खंडो बलाळ रामराम सु॥ स्वमस अशर मया अलफ तुह्मी पत्र पाठविले ते पावोन वर्तमान कळो आले रा। दादाजी नरसी याचे कुलकर्णाचे वतनी गाव व सेत व घरठाव त्याचे स्वाधीन केले ह्मणून लिहिले त्यावरून समाधान जाले ऐसियास तुह्मी जे गोष्टी केली ते उचित केली आजिपर्यंत यास आह्मी जतन केले हाली तुमचे पदरी घातले आहेत सर्वप्रकारे चालवायास अंतर न करणे जाणिजे छ ७ सफर बहुत काय लिहिणे