लेखांक ३१६
श्री
राजश्रियाविराजित राजश्री दादाजी नरसींह स्वामी गोसावी यासि पोष्य खंडो बलाळ दंडवत प्रा। उपरी येथील कुशल जाणून स्वकीय लिहिणे यानंतर तुह्मी पत्र पाठविले ते पावले लिहिले वर्तमान कळो आले रा। येसाजी प्रभु आले याणी साकल्य सांगितले ऐशास प्रस्तुत रा। कृष्णाजी प्रभु स्वारीस गेले आहेत ते आल्याउपरी तुमच्या त्याच्या विचारे जो निर्वाह करणे तो केला जाईल आपले समाधान असो देणे बहुत काय लिहिणे कृपा असो दीजे हे विनंती