लेखांक ३१५
श्री १६०८
नकल
मो। आनाम दादाजी नरस प्रभु देशकुलकर्णी ता। भोर व ता। उत्रोली तपे रोहिडखोरे यासि शंकराजी नारायण सचिव सु॥ सबा समानीन अलफ राजश्री स्वामीची आज्ञा माहालोमाहालची जती हकलाजिमा व इनामती व इसाफतीची जाली तेणेप्रमाणे तुमचे वतनाची हरदू खोरियाचे गावगनाची जाली असता तर्फ मजकूरचा वसूल घेतला हे विदित जाले या कामास स्वार पाठविले आहेत यास मसाला रुपये २५ आदा करणे जाणिजे छ २५ मोर्तब* असे
रुजु सुद बार