लेखांक ३०८
श्री
यादि बापूजी रामचंद्र कुळकर्णी देहाय ता। भोर तपे रोहिडखोरे सु॥ सलास सलासीन मया तैन व अलफ शके १७५४ नंदननाम संवत्सरे फाल्गुन वद्य ६
१ आमचे तीर्थरूप रामाजी कृष्ण व चुलते चिटको यशंवत हे पेशवे याजबरोबर पाणपतास गेले तेथे तीर्थरूप गर्दीत गेले व चुलते तिकडेच होते मागे आह्मी लाहान आपले अजीचे मोर मौजे मुगाव ता। मोसेखोरे तेथे होतो गावी आमचा जानु सुर्वा व खंडु सिद गुरेसुधा होता इनामाची व दुमाल्याची चाकरीसुधा वहिवाट करीत होता त्याजला गावकरी यानी दाबून इनामाचे व दुमाल्याचे बाद पडावले राहू दिल्हे नाहीत पुढे काही वर्षानी हिंदुस्तानातून चुलते परत घरी आले वगैर