लेखांक ३०१
श्री
यादी कारकिर्दी
सीवाजीमाहाराज संभाजी माहाराज याचे कारकीर्दीत जाला
मजकूर
राजारामसाहेब मंचकारूढ जाले शके १६०२ वैशाख वद्य ३
संभाजीराजे यास राज्याभिषेक शके १६०२ दुर्मतीनाम संवत्सरे माघ शु॥ १०
भागानगर औरंगजेब याणी घेतले शके १६०५
औरंगजेब पातशाहानी संभाजी माहाराजास तुळापुरी मारले शके १६१० विभवनाम संवत्सरे
औरंगजेब याणी विजापूर घेतले शके १६११ शुक्लनाम संवत्सरे
शाहुमाहाराज याची कारकिर्दीत जन्म शके १६०२
माहाराजास औरंगजेब याजपासी नेले शके १६११
राजारामसाहेब सिंहगडी वारले शके १६२१
औरंगजेब नगर मुकामी वारला शके १६२८
राज्याभिषेक शके १६२९
आईसाहेबाचे पुत्र सीवाजीराजे वारले शके १६३३
रामराजे याचा जन्म शके १६३४
शंकराजी नारायण वारले शके १६३४
नंदननाम संवत्सरे सचिवीची वस्त्रे नारो शंकर यास जाली शके मजकुरी
परशराम प्रतिनिधि माहाराजानी कैद केले बेडी घातली शके १६३३
बाळाजी विश्वनाथ यास पद जाले प्रधान शके १६३५
माहाराजाची मातुश्री दिल्लीहून देसी आली शके १६४०
परशराम प्रतिनिधि वारले शके १६४०
खंडेराव दाभाडे वारले शके १६५०
प्रधान व सेनापति लढले शके १६५२
शाहू व संभाजीराजे याच्या भेटी कराड मुकामी जाल्या शके १६५२
राजगड हपसी याजपासून परत घेतला शके १६५५
फिरंगी याची लढाई प्रधानासी जाली शके १६५८
वसई फिरंगी याजपासून घेतली शके १६६१
बाळाजी विश्वनाथ वारले शके १६६२
किलीजखान निजामलमुलुक वारले शके १६६९
जिवाजी खंडेराव चिटनीस वारले शके १६६४
धाकटी धनीन वारली १६७०
शाहूमहाराज वारले शके १६७१