लेखांक २९५
श्रीनागनाथ १६४० फाल्गुन वद्य ६
नकल असल प्रो।
राजश्री मताजी सर्ज्याराव जेधे देशमुख
ता। भोर तपे रोहिडखोरे गोसावी यासि
॥ अखंडितलक्ष्मीआलंकृत राजमान्य श्रीा नारो शंकर व माहादाजी शकर देशकुलकर्णी ता। मजकूर आसिर्वाद सु॥ तिसा अशर मया अलफ शके १६४१ विकारी संवत्सरे वैशाख वद्य पचमी इदुवासरे पत्र लेहून दिल्हे ऐसे जे तुमचे बाप राजश्री सर्जाराव जेधे याणी आपले बाप तीर्थरूप राजश्री शंकराजी नारायण गाडेकर यासी पुर्वी तर्फ मजकूरचे देशकुलकर्णाचे वतन करून दिल्हे ते समई मौजे कारी तुमचा इनाम गाव तेथे देशकुलकर्णाचा घरठाणा व सेत दिल्हे त्याची याद दाखविली नव्हती आपले बाप पुर्वी कारीस आले होते ते समई राजश्री सर्ज्याराव यानी घरठाण दाखविला होता परतु घर बाधले नव्हते साप्रत आह्मी कारीस येऊन घराची व सेताची हद तुह्मास पुसिली त्यावरून तुह्मी आपले भाऊ
कान्होजी जेथे खंडोजी जेधे
१ १
हाणमंतराव जेथे
१
येणेप्रमाणे भाऊ व मुळवे व मोकदम मिळोन घराचा पाया दाखविला देखील खाचर व पायेटे व मोरी यास रुके .॥. चोविस रुकियाचे सेत आमचे स्वाधीन केले असे याउपरी आह्मी सदरहू प्रो। वंशपरंपरेने अनभऊन तुह्मी भाऊपणे राहो ए गोष्टीस अतर करणार नाही याखेरीज हकलाजिमा व किरकोल बाब कारीस काही घेणार नाही छ १९ जमादिलाखर हे पत्र सही
कारकून
२ नरसो एसाजी व १ व्यकाजी दादाजी
शामजी एसाजी कारभारी
१ जानो सिवदेव
कारभारी ताा माार
साक्ष
मुलवे दि॥ देशमुख मोकदम
मौजे कारी १ सीवाजी भडाक मोकदम
मौजे आंबवडे
१ वरवाजी घोलप २ चिखलगाव
१ धुल माहाल १ बणाजी धोडा
१ सुभानजी कोढालकर १ बापू धोडा
-------
१ तुकोजी रणडावला २
१ सुर्याजी जेधा १ साबाजी विलेकर मौजे
१ बकाजी सणस वडतुबी
१ सुबाजी तुपा २ कोरल
------
७ १ अनाजी चिमणा
१ जिवाजी चिमणा
----------
२
----------
८