लेखांक २९४
श्री १६३६ माघ वद्य ३
स्वस्ति श्री राज्याभिषेक शके ४१ जय संवत्सरे माघ बहुल त्रितीया भृगुवासरे क्षत्रियकुलावतंस श्री राजा शाहु छत्रपतिस्वामी याणी मोकदम मौज आगसोले ता। रोहिडखोरे यासि आज्ञा केली ऐसि जे रा। कृष्णाजी दादाजी देशकुलकर्णी हे मौजे मजकुरी कुणबावियाने सेत करितील त्यास करू देणे सेत करितील त्याचा रास्ती महसूल घेणे जाजती उपसर्ग न देणे जाणिजे लेखनालंकार
मर्या
देय रा
जते
रुजू सुरनिवीस
सुरु सूद
बार