लेखांक २९३
श्री १६३५ फाल्गुन शुध्द १४
राजश्री खंडोजी गायकवाड हवलदार व कारकून किले यासि
l अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य श्रीा बाळाजी विश्वनाथ प्रधान आसिर्वाद व नमस्कार सु॥ अर्बा अशर मया अलफ किले मजकुरी कारखानिसी पाहिजे याकरिता येसाजी दादाजी हुजूर उमेदवार होते त्यास कारखानिसी सांगोन पाठविले असे तरी तुह्मी एकमते राहोन स्वामिकार्य करीत जाणे यास वतनदारानी माजी करार केले असेत वजावाटाव दंडकप्रमाणे वजा करून उरले वेतन सिरस्त्याप्रमाणे पावणे यास जमान रा। रामजी बाजी देशपांडे पा। हिरडसमावळ घेतले असेत छ १२ सफर आज्ञाप्रमाण
बार सुरुसुद बार