लेखांक २९२
श्री १६३४ भाद्रपद वद्य ५
नकल
स्वस्ति श्री राज्याभिषेक शके ३८ खरनाम संवत्सरे भाद्रपद बहुल पंचमी गुरुवासरे क्षत्रियकुलवतंस श्री राजा शाहु छत्रपतिस्वामी (सिका) याणी रा। मताजी सर्जाराऊ जेधे देशमुख भोर तपे (सिका) रोहिडखोरे यासी आज्ञा केली ऐसी जे तुह्मी विनतीपत्र पाठविलेत प्रविष्ट जाले लिहिले वर्तमान विदित जाले हारामखोराचे लस्करानी धामधुम बहुत च केली मुलुक वैरान जाला हारामखोराचे लोकामधे आपणामधे जुझ जाले च्यार पाच आपणाकडील पडिले त्याकडिल च्यार पाच पडिले सात पाच जखमी स्वामीचे पुण्ये फते जाली आमची निष्ठा स्वामीचे पायापासी आहे त्याचा हिसाब धरितो ऐसे नाही ह्मणोन लिहिले हारामखोरास नतीजा दिल्हा उत्तम जाले पुढे हि त्याचा हिसाब न धरिता वरचेवरी ठेचगा देत जाणे आपले निष्ठेचे वृत्त लिहिले तरी तुह्मी वतनदार एकनिष्ट सेवक आहा तुह्मास स्वामीचे पायावेगले दुसरा अवलब नाही हा स्वामीस व तुला भरवसा आहे असे असता स्वामिकार्यास अतर करो नये कार्य धडो पाहते हारामखोराचे मही माहाडा करून आपले सेवेचा मजुरा करून घेणे स्वामी तुमची सर्फराजी करितील लेखनालंकार मोर्तब
सुरु सूद