लेखांक २८५
श्री १६१५ मार्गशीर्ष शुध्द ७
नकल
राजश्री मलार येसाजी सुभेदार व कारकून ता। मावल
प्रात राजगड गोसावी यासि
अखंडितलक्ष्मीआलंकृत राजमान्य सेवक संकराजी नारायण नमस्कार सु॥ अर्बा तिसैन अलफ मो। बाजी सर्जाराव जेधे देशमुख ता। भोर ता। रोहिडखोरे याणी विदित केले की आपण राज्यामधी कष्ट मशागती केली ताबराची फिशात जाली त्या प्रसगामधी आपण एकनिष्टपणे राहून सेवा केली आहे विलाइत खराब पडली होती त्यास रयतेस धीर भरवसा देऊन वसाहात केली आहे त्यास आपले ता। मा।री इनाम गाव पुर्वीपासून चालले आहेत
मौजे अंबवडे १ मौजे नाटंबी १
मौजे चिखलगाव १ मौजे करी १
एणेप्रमाणे देहे च्यार पुर्वीपासून इनाम चालिले आहे त्यास आपण चदीचे मुकामी जाऊन राजश्री छत्रपतिस्वामीसन्निध विनती केली की आपले गाव इनाम आहेत ते दुमाला केले पाहिजेत त्यावरून राजश्री स्वामी कृपाळु होऊन ईनाम गाव सदराहू दुमाला करून पत्रे दिल्ही ऐशास सदरहू गाव आपणास दस्तमाफक दुमाला केले आहेत तरी तेणेकरून आपली अवकत चालत नाही तरी आपले गाव कुलबाब कुलकानु दुमाला केले पाहिजे तेथे कीर्द माहामुरी करून सुखरूप राहू ह्मणोन विदित केले त्यावरून मनास आणिता याणी राज्यामधी कष्ट मशागत केली आहे राजश्री छत्रपतिस्वामी कर्नाटक प्रातास गेले त्यासमई मोगलाची फिशात बहुत च जाली होती मा।रनिले एकनिष्ठेने राहून लोकाचा जमाव करून किले विचित्रगड गनिमापासून हस्तगत केला त्यावरी विलाइती कुल खराब पडली होती त्याची लावणी सचणी केली त्याउपरी चदीस जान राजश्री स्वामिसन्निध विनती करून सदरहू गावची दुमालपत्रे आणिली देशमुख मजकुर स्वामीकार्याचे एकनिष्ट याकरिता सदरहू याचे गाव कुलबाब कुलकानु याचे हवाला करण्याची तुह्मास आज्ञा केली आहे तरी सदरहू देह च्यार पूर्वीपासून चालले आहेत त्याप्रमाणे कुलबाब कुलकानु गाव दुमाला करणे दर साल ताजे सनदेचा उजूर न करणे सालमजकुरी दस्तमाफक (सिका) चालवणे पेस्तर सालापासून गाव कुलबाब कुलकानु दुमाला करणे सनदेची तालिक लेहून घेऊन असल सनद देशमुखापासी परतोन देणे छ ५ रबिलाखर निदेश समक्ष मोर्तब
सुरुसुद बार
पा। छ ११ जिल्हेज
सन खमस