लेखांक २८०
श्री १६०७ ज्येष्ट शुध्द ७
किंवा
१६०८ ज्येष्ट शुध्द ७
नकल
राजमान्य राजश्री कृष्णाजी दादाजी प्रभु देशपांडे सबनीस व जामनीस नि॥ लोक हशम दि॥ हुजरात मोजे कारी वडतुबी कोरळ चौकी कोरळखिंड ता। रोहिडखोरे गोसावी यासि
श्रीा शंकराजी नारायण आसिर्वाद उपरी मावळ प्रा। गनिमानी चाल केली आहे ह्मणोन समजले त्यास कोरळखिंड व ढवला घाट व माडरदेवचा सडा येथील जागा जागा चौक्या घालून गनीमाची खबर ठेऊन कमकसूर खास बातमी पावती करणे राजगडी कळविला च तुमची कुमक रोहिड वगैरे जागाहून होईल तुह्मी सिरवली मर्दमु चागली केली हे खबर येथे समजली या वेळी गनीम नामोहरम सर्वांनी करावा तुह्मी जमेदार व सरचाकर माहाराजाचे वेळचे +++ करोन दाखवतील हा भरवसा आहे रा। छ ५ रजब सु॥ सीत समानीन अलफ बहुत काय लिहिणे