लेखांक २६८
श्री १५६७ वैशाख शुध्द १
(सिका) (नकल)
राजश्री दादाजी नरस प्रभु देशपांडे व कुलकर्णी ता। रोहिरखोरे व वेलवडखोरे यासि प्रति सीवाजीराजे सु॥ खमस अर्बैन अलफ तुह्मास मेहरबान वजिराचा विजापुराहून हुकूम आला तो ठाणे सिरवलाहून अमिनानी तुह्माकडे पाठविला त्याजवरून तुमचे बाप नरसिबावा हवालदिल जाले वगैरे कितेक बहुतेक लि॥ त्यास शाहासी बेमानगिरी तुह्मी व आह्मी करीत नाही श्रीरोहिरेश्वर तुमचे खोरियातील आदि कुलदेव तुमचा डोगरमाथा पठारावर शेद्रीलगत स्वयभू आहे त्याणी आह्मास यश दिल्हे व पुढे तो सर्व मनोरथ हिंदवी स्वराज्य करून पुरविणार आहे त्यास बावास हवाल होऊ नये खामाखा सागावा आणि तुह्मी तो कागद घेऊन सिताब हुजूर येणे राजश्री श्रीदादापताचे विद्यमाने बावाचे व तुमचे व आमचे श्रीपासी इनाम जाले ते कायम वज्रप्राय आहे त्यात आतर आह्मी व आमचे वशज लेकराचे लेकरी वतन वगैरे चालविण्याविसी कमतर करणार नाही हे राज्य व्हावे हे श्रीचे मनात फार आहे त्याप्रमाणे बावाचे मनाची खातरी करून तुह्मी येणे रा। छ २९ सफर बहुत काय लिहिणे (मोहोर)
रुजू सुरनीस माहे सफर बार