लेखांक २६७
श्री १५६७ चैत्र शुध्द १३
(सिका) (नकल)
इजतअसार दादाजी नरस प्रभु देशपांडे कुलकर्णी ता। रोहिडखोरे व वेलवडखोरे यासि सु।। खमस अर्बैन अलफ वजारतमाहब सीवाजीराजे फरजद शाहाजीराजे याणे शाहाजीसी बेमानगी करून तुझे खोरियात रोहिरेश्वरचे डोगराचे असराण पुडावेयाने मावले वगैरे लोक जमाव केला आणि तेथून जाऊन पेशजी किल्यावरील ठाणे उठऊन आपण किल्यात सिरला हाली राजगड किला नाव करून बलकावला तो हि बेलवडखोर्यालगत त्यास लोकाचा वगैरे जमाव तू सामील असून फिसात करून रसिद राजे मजकूरनिल्हेस देतोस व ठाणे सिरवली आमिनासी रुजु राहत नाहीस व जमाव बितरजुमा करीत नाहीस व तनखा हि हरदु तपियाचा दिवाणात देत नाहीस मगरुरीचे जबाब ठाणगे व नाइकवाडियासि देतोस हे जाहिरात आले त्यास हे नामाकुल गोष्ट तुझे जमेदारीचे इजतीस आहे तरी ठाणेमजकुरी आमिनासी रुजू राहणे आणि तनखा साह करोन देणे हे न जालियास खुदावत शाह तुजला विजापुरी नेऊन गरदन मारतील व जमेदारी हककानु चालणार नाही हे मनी समजणे आणि याउपरी दिवाणात रुजू राहणे छ ११ सफर (मोर्तब पारसी सपैल कलम लि॥ आहे सदरहू पत्र पादशाही वजिराचे पारसी सिका मोर्तबसहित दफतरी आहेत)